कोपरखैरणे:-शिवछत्रपती को ऑप के्डिट पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न.
संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483
शिवछत्रपती को ऑप के्डिट पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न.
आज दिनांक 28-08-2022 रोजी कै अण्णासाहेब पाटील स्मृती भवन सेक्टर 5 कोपर खैरेणे येथे शिवछत्रपती को ऑप के्डिट पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली ,या सभचे अध्यक्ष स्थान श्री मारूती कोंडे साहेब यांनी भुषविले,या सर्वसाधारण सभेला पतसंस्थेचे बहुसंख्य सभासद उपस्थित राहिले,या वार्षिक सभेसाठी संस्थेचे मार्गदर्शक व नवी मुंबई महानगरपालिका सभागृह नेते श्री रवींद्र ईथापे साहेब यांनी उपस्थित राहुन संचालक मंडळास अनमोल असे मार्गदर्शन केले, प्रसंगि यशोमंदिर पतसंस्थेचे संचालक ॲड श्री जयसिंग बांगर साहेब ,त्यांचे सहकारी जेष्ठ संचालक श्री पाफाळे साहेब,तसेच भिमराव हांडे साहेब, सावधान महाराष्ट्र चे पत्रकार श्री राजेन्द्र बोडके साहेब,व 2022 ते02027 या कालावधि करिता नवनिर्वाचित संचालक मंडळ पुढील प्रमाणे बिनविरोध झाले अध्यक्ष श्री मारूती कोंडे, उपाध्यक्ष श्री दिनकर गायकर,श्री बाळशिराम फलके,श्री लक्ष्मण आरोटे,श्री शरद गाढवे,श्री बाळासाहेब पाबळे,श्री महेश कापसे,श्री शंकर लोहार,सौ वंदना शिंदे सौ अनिता निकम,सौ अनिता गोंदके ,या संचालकांना मार्गदर्शक नेमणूक म्हणून तज्ञ संचालक म्हणून श्री धनंजय पाटील यांची नियुक्ती करण्यात आली, सभेचे प्रात्साविक श्री आरोटे बाबायानिं तर लाभांश वाचन श्री शरद गाढवे यांनी व नफा तोटा ताळेबंद पत्रक श्री धनंजय पाटील यांनी वाचुन सभागृहासमोर मांडले, सामाजिक बांधिलकी म्हणून पतसंस्थेने विद्यार्थी गुणगौरव सोहळा ठेवला असता याला भरभरून प्रतिसाद मिळाला विद्यार्थीनां शाळेची बॅग व प्रमाणपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले पतसंस्थेची आरटीजीस प्रणाली,क्युआर कोड ,को बॅकिंग प्रणाली , सुसुत्रता , पारदर्शकता कशा असावा हे बघुन शिवछत्रपती पतसंस्थेची वाटचाल प्रगती पथावर आहे असे दिसून आले. अंतर्गत लेखा परीक्षण अहवाल श्री धनंजय पाटील यांनी वाचुन सभागृहासमोर मांडला,आभार प्रदर्शन संस्थेचे अध्यक्ष श्री मारूती कोंडे साहेब यांनी माणुन राष्ट्रगित घेऊन सभा समाप्ती घोषित केले