ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

पाटण:-येरफळे, गुढे व दाढोलीतील अनेक कार्यकर्त्यांचा पाटणकर गटाला रामराम! – पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश.

पत्रकार महेश मोहिते सातारा तालुका क्राईम रिपोर्टर

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

पाटण:-येरफळे, गुढे व दाढोलीतील अनेक कार्यकर्त्यांचा पाटणकर गटाला रामराम! – पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश.

दौलतनगर : पाटण विधानसभा मतदारसंघातील येरफळे, गुढे व दाढोली येथील अनेक कार्यकर्त्यांनी पाटणकर गटाला रामराम करत महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे संबंधित गावांतील राजकीय घडामोडींना महत्त्व प्राप्त झाले आहे.

पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत येरफळे, गुढे व दाढोली येथील ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. यावेळी पालकमंत्री देसाई यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे शिवसेना परिवारात स्वागत करून त्यांच्या पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

येरफळे येथील प्रवेशकर्ते :
उमेश भिसे, आनंदा भिसे, कृष्णत भिसे, विजय भिसे, शंकर भिसे, हणमंत भिसे व सागर भिसे यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

गुढे येथील प्रवेशकर्ते :
अनिकेत पाचपुते, अभिजीत पाटील, विठ्ठल करपे, सुशांत सोनावले, अभिजीत देसाई, सागर गायकवाड, विठ्ठल माने, रविराज करपे, अंकुश साळुंखे, अधिक करपे, अविष्कार करपे, धीरज पाटील, अविनाश सोनावणे, प्रणव करपे, अथर्व करपे, प्रथमेश करपे, आयुष करपे, शंभूराज चव्हाण व प्रवीण कदम यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

दाढोली येथील प्रवेशकर्ते :
दिलीप सुतार (व्हा. चेअरमन, दाढोली विकास सेवा सोसायटी), कृष्णत डांगे, अरुण किसोळे, संभाजी पाटील, किरण डांगे, बाबू डांगे, दाजी डांगे व हणमंत डांगे यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रवेशकर्त्यांशी संवाद साधत त्यांच्या गावातील विकासकामांना प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही दिली. गावांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सदैव कटिबद्ध असून विकासकामांच्या बाबतीत कोणतीही कमतरता भासू देणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध गावांमधून कार्यकर्त्यांचे शिवसेनेत प्रवेश होत असल्याने स्थानिक राजकीय समीकरणांमध्ये बदल घडताना दिसत आहेत. येरफळे, गुढे व दाढोली येथील या सामूहिक पक्षप्रवेशामुळे शिवसेनेच्या स्थानिक संघटनात्मक बांधणीला नवे कार्यकर्ते जोडले गेले आहेत.

यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच विविध गावांतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button