आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई:- शालेय फुटबॉल क्रीडा स्पर्धेमध्ये किसन वीर कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाचा डंका.

पत्रकार शिंदे पुणे जिल्हा महिला PRR

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

  पत्रकार शिंदे पुणे जिल्हा महिला PRR

वाई दि.06
शालेय फुटबॉल क्रीडा स्पर्धेमध्ये किसन वीर कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाचा डंका.

 

छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा येथे झालेल्या शालेय फुटबॉल स्पर्धा २०२३-२४ मध्ये किसन वीर कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक मिळविला व त्यांची वारणानगर, कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेकरिता निवड झाली. वारणानगर येथील विभागीय फुटबॉल स्पर्धेत किसन वीर कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने चतुर्थ क्रंमाक मिळविला या संघातील ईश्वरी पोळ, दीक्षा गाडे (गोल किपर), साक्षी कदम व अंकीता गाढवे यांची राज्यस्तर फुटबॉल स्पर्धा निवड चाचणी करीता निवड झाली. या खेळाडूंना श्री. एस.टी. चव्हाण व श्री. एम .व्ही. जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. मदनदादा भोसले, उपाध्यक्ष मा. शंकरराव गाढवे, सचिव डॉ. जयवंत चौधरी, खजिनदार नारायण चौधरी, विश्वस्त मंडळ, प्राचार्य डॉ. गुरूनाथ फगरे, उपप्राचार्य विवेक सुपेकर, पर्यवेक्षक बाळासाहेब कोकरे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी खेळाडूंचे व मार्गदर्शकांचे अभिनंदन केले.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button