महाबळेश्वर येथील बेकायदेशीर बांधकामांवर नगर पालिकेची कारवाई.
पत्रकार रियाज मुजावर महाबळेश्वर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार रियाज मुजावर महाबळेश्वर तालुका अध्यक्ष
महाबळेश्वर येथील बेकायदेशीर बांधकामांवर नगर पालिकेची कारवाई.
काल गुरुवार सकाळी महाबळेश्वर नगरपालिका , तहसिल महसुल, पोलिस अधिकाऱ्यांसह, कर्माचारी वर्गाचा मोठ्या फौज फाट्यासह वेण्णा लेक परिसरा जवळील वेण्णा नदी पत्रा शेजारील मिळकतीं वर ही कारवाई करण्यात आली आहे. हॉटेल विंटर टाउन येथील बांधकाम पाडण्यात आले वेण्णानदी पात्रातील बांधकाम कारवाई सुरु असलेल्या घटनास्थळी प्रांत राजेंद्रकुमार जाधव, तहसिलदार तेजस्विनी पाटील पालिकेचे प्रशासक योगेश पाटील उपस्थित होते. कारवाई सुरू असताना अचानक सुरू झालेल्या कारवाईमध्ये नदी पात्रात असणाऱ्या काही बेकायदेशीर इमारतींवर नगरपालिकेचा हातोडा पडला. तर एका ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्थानिक नागरिक आल्यामुळे घटनास्थळी गोंधळ उडाला. व काही काळ महाबळेश्वर पांचगणी रोड वर रस्ता रोको करण्यात आला होता एका इमारत मालकाने डिझेल अंगावर घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. काही काळ तणाव निर्माण झाला होता मोहिम तात्पुरती पंधरा दिवस थांबविण्यात आली आहे