कराड:-संजयनगर ,शेरे गावाचा डोंगरी भागात समावेश; सुदामराव जाधव यांच्या प्रयत्नाला यश.
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS
संजयनगर ,शेरे गावाचा डोंगरी भागात समावेश; सुदामराव जाधव यांच्या प्रयत्नाला यश.
कराड :(सातारा) दि .२१, : कराड तालुक्यातील संजयनगर ,शेरे गावाचा डोंगरी गावामधे समावेश करण्यात यावा.यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे यांच्या कडे निवेदनद्वारे मागणी केली होती. या निवेदनाची शासनाने दखल घेत अखेर संजयनगर गाव डोंगरी मधे समाविष्ट करण्यात आले.डोंगरी विभाग विकास कार्यक्रमांतर्गत सुधारण्यात आलेले निकष कराड दक्षिण मतदार संघ मधे संजयनगर,शेरे या गावचा समाविष्ट करण्यात आला आहे. भटक्या विमुक्त गोपाळ समाज सामाजिक संघटनेचे राज्याध्यक्ष सुदामराव जाधव यांच्या विशेष प्रयत्नाने कराड दक्षिण मतदार संघामधे डोंगरी भागात समावेश करण्यात आला आहे. सदर निर्णय डोंगरी विकास विभाग कार्यक्रमांतर्गत सुधारित निकष नुसार जाहीर करण्यात आला आहे. लवकरच कराड तालुक्यातील संजयनगर, शेरे या गावाला विकासासाठी विशेष व प्रचंड निधी उपलब्ध होणार असल्याने संजयनगर गावात (Development Program) विकासाची गंगा पहावयास मिळणार आहे.
कराड दक्षिण मधे संजयनगर गावात सुदामराव जाधव यांनी विकासाचा झंझावात उभा केला आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात विविध झपाट्याने विकास होत आहे. सदर गावांचा विकास व्हावा यासाठी यांचा डोंगरी भागात समावेश करण्यात यावा यासाठी सुदामराव जाधव हे मागील अनेक दिवसापासून प्रयत्नशील होते. या पाठपुराव्यां साठी विशेष प्रयत्न अजित जाधव, प्रमोद सकटे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विमुक्त जाती भटक्या जमाती तालूका अध्यक्ष अनिल चिकोडिकर या सर्व पदाधिकाऱ्या मुळे यश प्राप्त झाले..तसेच शासनाच्यावतीने या गावांच्या विकासासाठी विशेष निधी उपलब्ध करुन दिला जाणार आहे. सदर (Development funds) निधीच्या माध्यमातून परिसरात प्राथमिक शिक्षण, पाटबंधारेची कामे, रस्ते विकासाची कामे, पाणी पुरवठ्याची कामे, समाज मंदिर, सामाजिक सभागृह, उपसा सिंचन योजना, एसटी निवारा, अंगणवाडी इमारत बांधकाम अंतर्गत अंगणवाडी इमारत दुरुस्ती, अंगणवाडी इमारत, संरक्षण भिंत, नाविन्यपूर्ण वर्ग खोल्या बनविणे, शैक्षणिक साहित्य, सौरऊर्जेवरील दिवे, विद्युत विकास कामे मोठ्या प्रमाणात केली जाणार आहेत.