ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

मुंबई:-धैर्यशील कदमांच्या पाठीशी भाजपाचे संपूर्ण पाठबळ :- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

प्रतिनिधी सौरभ चव्हाण खटाव:-9503995968

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:- 8208717483

धैर्यशील कदमांच्या पाठीशी भाजपाचे संपूर्ण पाठबळ :- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

वडूज
महाविकास आघाडीच्या काळात मागील अडीच वर्षे रखडलेली विकासाची प्रक्रिया पूर्ववत सुरु करून महाराष्ट्राला पुन्हा अच्छे दिन आणण्याची खबरदारी महाराष्ट्र सरकार घेत आहे त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील कराड उत्तर विधानसभा मतदारसंघावर आमचे वैयक्तिकरित्या लक्ष असून येथील जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी, विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी महाराष्ट्र सरकार वचनबद्ध असून कराड उत्तरला भरघोस निधी देऊन धैर्यशील कदमांच्या पाठीशी भाजपाचे संपूर्ण पाठबळ उभे केले जाईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
कराड उत्तर भाजपाचे नेते वर्धन ऍग्रो कारखान्याचे चेअरमन धैर्यशील कदम यांनी गुरुवारी मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सातारा भाजपा जिल्हाध्यक्ष आ.जयकुमार गोरे, आ.राहुल कुल यांची बैठक संपन्न झाली. बैठक प्रसंगी धैर्यशील कदम यांनी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या विविध विकास कामांना निधी उपलब्ध व्हावा याबाबत याबाबत उपमुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन सादर केले.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले विकासाभिमुख नेतृत्वाला भाजपा नेहमीच सहकार्य करीत असतो धैर्यशील कदम हे स्वाभिमानी नेतृत्व आहे त्यांच्या पाठीशी मतदार आहेत वैचारिक दूरदृष्टी असणाऱ्या कदम यांनी खटाव सारख्या दुष्काळी भागात औद्योगिक क्रांती घडवून वर्धन ऍग्रो कारखाना सुरू केला आहे ज्यावेळी दुष्काळाने लोक होरपळत होते,कोरोना महामारी वेळी घराबाहेर पडायला भीत होते त्यावेळेस पिण्याच्या पाण्याच्या टाकी पासून ते लोकांना अन्नधान्यासाठी तसेच कोरोना प्रतिबंधक औषधे मोफत पुरवून त्यांनी समजाप्रती असलेली बांधिलकी सिद्ध केली आहे आपल्या मतदारसंघातील जनतेला आवश्यक त्या शिक्षण,पाणी, आरोग्य,रस्ते,वीज आदि मूलभूत सुविधा मिळणेसाठी त्यांची धडपड वाखाणण्याजोगी आहे अशा नेतृत्वाला बळ देण्यासाठी कराड उत्तरच्या विकासासाठीला आम्ही बांधील आहोत.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button