सातारा:-वंचित बहुजन आघाडीच्यावतीने साताऱ्यात मराठा आरक्षणाला जाहीर पाठिंबा…..
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
वंचित बहुजन आघाडीच्यावतीने साताऱ्यात मराठा आरक्षणाला जाहीर पाठिंबा…..
सातारा दि:
वंचितचे नेते आदरणीय ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रात मराठा आरक्षणाबाबत होत असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्याची व आरक्षण मिळेपर्यंत ठाम राहण्याची भुमिका वंचित बहुजन आघाडीने घेतली आहे. त्यानुसार सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणाबाबत आंदोलन सुरू असून त्यांची भेट घेऊन पाठिंबाचे पत्र वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आले . या वेळेला वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई, मराठा समाज समन्वयक शरद काटकर व तात्या सावंत , संदीप गोळे, शफीक शेख, संभाजी इंदलकर, अजित जगताप व मान्यवर उपस्थित होते .
घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मराठा समाजाला भविष्यात आरक्षणाची गरज ओळखुन त्याची तरतुद केली होती. परंतू जात अभिमानामुळे त्यावेळच्या काही लोकांनी स्पष्ट शब्दात नकार दिला पण आता नागरी सुविधा इतकीच आरक्षणाची गरज निर्माण झाली आहे.
सर्वसामान्य, गरीब, सीशित, कष्टकरी मराठा समाज आज गरीबीत जगत आहे त्यांना आरक्षण मिळाल्यास काही अंशी त्यांच्या परिस्थितीमध्ये बदल होणार आहे. याच भुमिकेतून सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणाऱ्या सर्व मराठा बांधवाना विनाशर्त पाठिंबा देत आहे. आंदोलनासाठी ज्या काही आवश्यक बाबी असेल त्याची पुर्तता करण्यास कटीबध्द आहोत. मराठा आंदोलनाला पाठिंबा देऊन वंचित असलेल्या गरीब समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचा हा प्रयत्न आहे. असे ही पत्रात नमूद करुन शासनाने वेळकाढूपणाचे धोरण अवलंबू नये. तसेच मराठा युवक मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी अशी ही प्रार्थना केली आहे. त्यांच्या उपस्थितीमध्ये मराठा आरक्षणाची घोषणा करावी अशी आमची प्रमुख मागणी आहे. असे ही पाठिंबा पत्रात नमूद केले आहे.
————————————————
फोटो -वंचित बहुजन आघाडीचे सातारा जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन पाठिंबा जाहीर केला (छाया- निनाद न्यूज, सातारा)