खटाव:-मायणी मुस्लिम समाजाचा मराठा आंदोलनाला जाहीर पाठिंबा.
ज्येष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके महाराष्ट्र प्रदेश संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके महाराष्ट्र प्रदेश संघटक
मायणी मुस्लिम समाजाचा मराठा आंदोलनाला जाहीर पाठिंबा.
मायणी प्रतिनिधी—–मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मायणी येथील मराठा समाज आंदोलनाला येथील मुस्लिम समाजाने जाहीर पाठिंबा दिला यावेळी बोलताना महाराष्ट्र ओबीसी मुस्लिम ऑर्गनायझेशन चे उपाध्यक्ष इब्राहिम तांबोळी म्हणाले की छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात मराठ्यांचे साम्राज्य निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने खांद्याला खांदा लावून काम केले आहे या मराठ्यांच्या स्वराज्यामध्ये कोणताही जातीभेद नव्हता स्वकीयांना सुखाने जगता यावे यासाठी महाराजांनी रयतेचे राज्य निर्माण केले त्याच महाराष्ट्रामध्ये आज मराठी बांधव आरक्षणासाठी सनदशीर मार्गाने आंदोलन करत आहेत त्यास आमचा जाहीर पाठिंबा आहे यावेळी मुस्लिम समाजाचे नेते झाकीर हुसेन नदाफ यांनी मायणी मध्ये हिंदू मुस्लिम ऐक्य परंपरा असून सामाजिक ऐक्य व परंपरेची जपणूक केली जाते येथील सर्व बांधव एक दिलाने काम करतात म्हणूनच आम्ही जाहीर पाठिंबा व्यक्त करीत आहोत यावेळी महाराष्ट्र ओबीसी मुस्लिम ऑर्गनायझेशन संघटनेचे सचिव मोहम्मद शरीफ आतार यांनी सांगितले की मुस्लिम समाजालाही आरक्षण मिळाले पाहिजे केवळ तीन टक्के आरक्षण म्हणजे एक प्रकारची बोळवण आहे तरी मराठा समाजाबरोबर मुस्लिम समाजालाही आरक्षण मिळणे काळाची गरज आहे कारण आता मुस्लिम समाज ही शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करीत आहे यावेळी एक दिवसाच्या उपोषणाला बसलेल्या डॉक्टर विकास देशमुख, डॉक्टर सुशांत देशमुख, दीपक कणसे, मानसिंगराव देशमुख, सुरज देशमुख, यांना या समाजाने जाहीर पाठिंबा व्यक्त केला त्याचबरोबर धोंडेवाडी ग्रामस्थांनी आंदोलनास्थळी दिवसभर उपस्थित राहून आंदोलनास पाठिंबा व्यक्त केला यावेळी अमित जमादार ,इब्राहिम तांबोळी ,गौस तबीब, समीर नदाफ, जहांगीर नदाफ, पापा नदाफ, इस्माईल बागवान ,इकबाल बागवान ,गणीभाई बागवान ,हर्षद नदाफ, तसेच मराठा समाजातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.