निगडी :-आप’’च्या पिंपरी-चिंचवड महिला विंग उपाध्यक्षपदी सौ. मैमुना शेख यांची नियुक्ती.
प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे :-9767275783

आप’’च्या पिंपरी-चिंचवड महिला विंग उपाध्यक्षपदी
सौ. मैमुना शेख यांची नियुक्ती.
पुणे, निगडी, दि. 8 (शफिक शेख) – पिंपरी-चिंचवड शहरातील महिलांच्या समस्या प्रखरपणे शासनासमोर मांडून त्यावर उपाययोजना करण्याच्या आम आदमी पार्टीच्या धोरणास निर्भिडपणे पुढे नेण्यासाठी आप’ च्या पिंपरी-चिंचवड महिला विंगच्या उपाध्यक्षपदी सौ. मैमुना जहीर शेख यांची आज शहराध्यक्ष अनुप शर्मा आणि महिला विंगच्या अध्यक्षा सौ. स्मिता पवार यांच्या हस्ते नियुक्ती झाली.
यावेळी शहराध्यक्ष अनुप शर्मा यांनी आणि सौ. स्मिता पवार यांनी सौ. शेख यांच्याकडून प्रथमतः पिंपरी-चिंचवड शहरातील महिलांसाठी आणि मग पक्षाच्या विकासासाठी अनमोल कामगिरी करण्याची आशा व्यक्त केली आहे.
आपले मनोगत व्यक्त करताना सौ. मैमुना शेख यांनी पार्टीचे अध्यक्ष, महिला विंग अध्यक्षा, सर्व कार्यकर्ते आणि जमलेल्या सर्व माता-भगिनींना त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व महिलांसाठी अहोरात्र झटण्याचे आश्वासन दिले.
(फोटो – डावीकडून चिंचवड स्टेशनप्रमुख ब्रम्हानंद जाधव, शहराध्यक्ष अनुप शर्मा, महिला विंग अध्यक्षा स्मिताताई पवार, महिला विंग सचिव अकिला इनामदार, महिला विंग उपाध्यक्षा सौ. मैमुना शेख, जिल्हा अध्यक्ष वहाब शेख, श्री. प्रकाश हगवणे, वैजनाथ शिरसाठ आणि इतर कार्यकर्ते.)