वाई औद्योगिक क्षैत्रात कामगार सुरक्षिततेचे तीन तेरा? अथर्व फाॅंड्री कंपनीत आणखी एका कामागाराचा मुत्यू.! जिल्हा कामगार अधिकारी मात्र सुस्तच ?
पत्रकार नित्यानंद मोरे वाई शहर प्रतिनिधी

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

वाई औद्योगिक क्षैत्रात कामगार सुरक्षिततेचे तीन तेरा? अथर्व फाॅंड्री कंपनीत आणखी एका कामागाराचा मुत्यू.! जिल्हा कामगार अधिकारी मात्र सुस्तच ?

सातारा वाई.
वाई औद्योगिक क्षैत्रात (MIDC) अनेक लहान मोठ्या कंपन्या कार्यरत आहेत. उलाढाल मोठी नफेखोरी मोठी मात्र ज्या कामगारांच्या जिवावर मोठी नफेखोरी चालू आहे त्याच कामगारांची सुरक्षा म्हणले की डोळेझाक होते.
यांचे उत्तम उदाहरण म्हणजे वाई औद्योगिक क्षैत्रातील अथर्व फाॅंड्री ही कंपनी आहे तीन चार महिन्यांपूर्वी याच कंपनीत एका परप्रांतीय कामगारांने भट्टी त उडी मारून मुत्यू झाल्याची घटना घडली होती.याच कंपनीत पुन्हा २३ वर्षीय जयप्रकाश शिवपती निषाद नावाच्या परप्रांतीय कामगाराचा हात मशिनच्या बेल्ट अडकून मशिनच्या आतील बाजूस ओढला जावून भिषण अपघात होऊन मृत्यू झाला हि घटना १४ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ३.४० च्या सुमारास घडली आहे.
असे अनेक लहान मोठे प्रकार वाई औद्योगिक क्षैत्रात सातत्याने घडत असतात.आता काहीच दिवसांपूर्वी वाई औद्योगिक क्षैत्रात मुर्ती कारखान्याला आग लागली होती सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. यासाठी सातत्याने अनेक कामगार संघटना वारोंवार जिल्हा कामगार अधिकारी यांचे कडे तक्रारी देखील करत असतात मात्र सातारा जिल्हा कामगार अधिकारी यांना कामगारांच्या अडचणी समजून घेण्यासाठी वेळ नसतो मात्र कंपनी आस्थापना यांच्यासाठी त्यांचेकडे मुबलक वेळ असतो. कामगारांकडून काय मिळणार? मिळणार ते सर्व कंपनी आस्थापना यांचेकडूनच मिळणार ! आजच्या या पुन्हा घडलेली १४ सप्टेंबर २०२६ च्या घटनेचा विचार केला तर असे म्हंटले तर काहीच चुकीचे ठरणार नाही.
आता तरी सातारा जिल्हा कामगार अधिकारी यांना जाग येणार का? की अजून कामगारांच्या मृत्यूच्या घटना घडण्याची प्रतिक्षा करत बसणार! सातारा जिल्हा कामगार अधिकारी यांच्या अशा मनमानी बेजबाबदार काम कार्य पद्धतीमुळे कामगार मात्र भयभीतच आहेत.



