श्रीरामपूर:-केसापुरात ०५ बिबट्यांचे दर्शन १ रानडुक्कर व १ कुत्रा केला फस्त ….
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष
केसापुरात ०५ बिबट्यांचे दर्शन १ रानडुक्कर व १ कुत्रा केला फस्त ….
श्रीरामपुर ( Rps स्टार न्युज प्रतिनिधी ) केसापुर – बेलापुर खुर्दला लागुन असलेले केसापुर गावातील टाकसाळ वस्तीवर ०५ बिबट्यांचे दर्शन येथील ग्रामस्थांना झाले आहे . यामध्ये दोन नर बिबट्या . एक मादी बिबट्या व दोन पिल्लं यांचा समावेश आहे आज दिनांक २६ऑक्टोबर २० २३ रोजी सकाळी ७ वा पोपट टाकसाळ यांच्या घरापासुन २५ फुटांवर असलेल्या उसात दोन बिबट्यांनी रान डुकराची शिकार केली . यावेळी रानडुकरांची किंचाळी आणि बिबट्यांच्या डरकाळी चा प्रचंड आवाज झाला . तसेच काल रात्रीच्या सुमारास टाकसाळ यांच्या कुत्र्याचा बळी या बिबट्यांनी हल्ला केला आहे . राहुल टाकसाळ यांना पाच ते सहा वेळेस या बिबट्यांचे दर्शन झाले
याबाबत गणेश टाकसाळ यांनी प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांना संपर्क करून वनविभागाला तात्काळ पिंजरा लावण्यास सांगावे अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने केली . या बिबट्यांमुळे वस्तीवरील नागरिकांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण पसरले आहे