कृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा:-साताऱ्यात एक बॅनर मराठा समाजासाठी पी. दत्ता यांचा उपक्रम.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

साताऱ्यात एक बॅनर मराठा समाजासाठी पी. दत्ता यांचा उपक्रम.

सातारा दि: मराठा समाजाला आरक्षण मिळावं या भावनेतून लाखो मराठा बंधू भगिनी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. अशावेळी समाजाचा एक घटक म्हणून त्यांना पाठिंबा देणे हे कर्तव्य आहे . त्या कर्तव्याची जाणीव ठेवून साताऱ्यातील कलावंत पी दत्ता म्हणजेच दत्ता पिसाळ यांनी काम सुरू केले आहे.साताऱ्यामध्ये राजकीय पुढार्‍यांना गाव बंदी करणारे फलक मोफत देण्याचा अभिनव उपक्रम राबविला आहे. आतापर्यंत दोनशे फलकांचे मोफत वितरण करण्यात आले आहे.
सध्या सातारा जिल्ह्यात ज्या ठिकाणी राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांना गावबंदी केलेले आहे. त्या गावात आता पी. दत्ता यांचे नाव सुद्धा झळकू लागले आहे. विशेष म्हणजे वाढदिवसानिमित्त इतरांचे फ्लेक्स तयार करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा वापरणाऱ्या हातानं या मोफत फलकाच्या अभिनव उपक्रमाने वाढदिवस साजरा केला जात आहे. त्यांचे अनेक मान्यवरांनी मनापासून कौतुक केलेले आहे.
सातारा जिल्ह्याचे सुपुत्र असलेल्या अनेक कलावंतांनी आपल्या हातातील कलेमुळे आपलं नाव सर्वत्र केलेले आहे. त्यामध्ये कलावंत
पी दत्ता यांचे चांगले नाव आहे. ग्रामीण भागामध्ये एवढं तंत्रज्ञान नसलं तरी सातारा शहरांमध्ये करंजे गावचे सुपुत्र पी. दत्ता यांनी ४२ वर्षांपूर्वी या क्षेत्रात पदार्पण केले असून आज त्यांनी लावलेल्या रोपट्याचा वटवृक्ष झालेला आहे. सुरुवातीला सातारा शहरात हाताने बोर्ड रंगवून त्यांनी आपल्या कलेला सुरुवात केली होती. .आज सातारा ,पुणे, मुंबई ,कोल्हापूर अशा विविध ठिकाणाहून फलक तयारी करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा सज्ज झालेले आहे. आतापर्यंत सातारा जिल्ह्यात प्रत्येक खेड्यापाड्यात पी. दत्ताचे फलक झळकले आहेत.
सध्या अत्याधुनिक यंत्रणा तसेच ग्राहकांना आवश्यक असणाऱ्या सर्व प्रकारचे फलक लावण्यामध्ये सध्या त्यांचा हातखंड आहे. एक मराठा लाख मराठा या घोषवाक्य प्रमाणे मराठा समाजाला आरक्षण मिळावे. या भावनेतून समाज बांधव प्रयत्न करत असताना आपण त्यांना वेळ देऊ शकत नाही. परंतु, आपण आपली कला त्यांना देऊ शकतो. या दृष्टीनेच त्यांनी सातारा जिल्ह्यात सर्व मराठा बांधवांना आवाहन करून मोफत पुढाऱ्यांना गाव बंदी करण्याचा फ्लेक्स तथा फलक देण्याची भूमिका बजावली आहे. दररोज किमान शंभर फ्लेक्स तयार करताना पुढाऱ्यांना गाव बंदीच्या फ्लॅटला प्राधान्य दिले जात आहे. कारण संपूर्ण महाराष्ट्रात पुढार्‍यांना जर मराठा आरक्षणासाठी तन-मन-धनाने जर तयार करायचा असेल तर त्यांना गावात येण्यापासून रोखले पाहिजे. या भावनेतूनच मोफत फलक देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. दहा बाय दहा, आठ बाय पाच, दहा बाय पंधरा अशा विविध आकाराचे ग्रामस्थांना फलक भेट देत आहेत. त्यांच्या या उपक्रमाबद्दल सकल मराठा समाज बांधवांनी मनापासून स्वागत केले आहे.

चौकट ——-
समाज बांधवांनीही याची नोंद घेऊन जशा पद्धतीने पी दत्ता यांनी मोठे मन दाखवलेले आहे. अशा पद्धतीने त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी सुद्धा आपले कर्तव्य बजावून त्यांना सहकार्य करावे. असे मराठा उद्योजकांनी सर्व मराठा बांधवांना आवाहन केले आहे.
——————————
फोटो —–

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button