ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

सातारा:-शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी सातारा जिल्ह्यात शक्ती प्रदर्शनाला जोर.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी सातारा जिल्ह्यात शक्ती प्रदर्शनाला जोर.

सातारा दि: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेची स्थापना केली होती. आज बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर शिवसेनेमध्ये दोन शकले पडलेले आहेत. परंतु, सामान्य शि वसैनिक गट तट विसरून फक्त शिवसेना या शब्दावर निष्ठा ठेवून मुंबईमध्ये होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी सज्ज झालेला आहे.
शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिंदे गट अशी शिवसेनेची विभागणी झाली असली तरी धनुष्य आणि बाण एकत्र आल्याशिवाय राजकीय शत्रू वर हल्ला करता येत नाही. हे त्रिवार सत्य शिवसैनिकांना माहित आहे. शिवसेना नेत्यांच्या महत्वकांक्षापुढे सामान्य शिवसैनिकांना आपले मत व्यक्त करता येत नाही. हे सुद्धा अधोरेखित झालेले आहे. शिवसेनेच्या स्थापनेपासून सातारा जिल्ह्यातील अनेकांनी आपल्या रक्ताचे पाणी करून शिवसेना मुंबई शहरात वाढवली फुलवली व त्याचा उपभोगही घेतलेला आहे. आज मात्र शिवसेनेमध्ये दोन गट पडल्यामुळे सातारा जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये नाराजी पसरलेली आहे.
हा आवाज कुणाचा शिवसेनेचा ही गगनभेद आरोळी शिण होत असताना जुन्या शिवसैनिकांना गलबलून येत आहे. तसं पाहिले तर सातारा जिल्ह्यातील शिवसेनेचा ढाण्या वाघ दगडू सपकाळ, बाबुराव माने, एकनाथ शिंदे, आनंदराव अडसूळ, सदाशिव सपकाळ अनेक नगरसेवक, शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, शिवसैनिक अशी भली मोठी नावांची यादी आहे.
या यादीमध्ये सातारा जिल्ह्याचे शौर्य सुद्धा दडलेले आहे. त्यामुळेच परळ, मुंबई, लालबाग ,दादर ,वरळी, भायखळा, चिंचपोकळी, भांडुप, विक्रोळी ,घाटकोपर, मुलुंड ठाणे व पुढे नवी मुंबई या ठिकाणी सातारा जिल्हा वासियांचे एक अभद्र फळी शिवसेनेच्या वाढीसाठी उपयुक्त ठरली होती. आता काळ बदललेला असून शिवसेनेमध्ये उभी फूट पडलेली आहे. माननीय उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने शिवाजी पार्क या ठिकाणी दसरा मेळावा घेण्याचे योजले आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजाद मैदानावर हा दसरा मेळावा घेण्याचे निश्चित केलेले आहे. सातारा जिल्ह्यातून दोन्ही बाजूच्या शिवसेना नेत्यांनी व जिल्हाप्रमुखांनी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित राहतील. असा दावा केला असला तरी सातारा जिल्ह्यातुन फारसं शिवसैनिकांनी दसरा मेळावा वर जाऊन उपस्थिती दाखवणे. ही अडचणीची बाजू ठरलेली आहे. सध्या मोठ्या प्रमाणात नियोजन केले जात असले तरी कट्टर शिवसैनिक यांच्यामध्ये दुफळी निर्माण झाल्यामुळे सामान्य शिवसैनिक जरी दसऱ्या मेळाव्याला गेले तरी सर्वजण शिवाजी पार्क किंवा आझाद मैदानावर उपस्थित राहतील. हे सांगणे कठीण आहे. कारण सर्वांचेच निष्ठा शिवसेनेवर असली तरी धनुष्यबाण एकत्र पाहणाऱ्यांना धनुष्य आणि बाण वेगळा पहाणे मनापासून आवडणार नाही. तरीही या दसरा मेळाव्याला जोश भरण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लागलेली आहे .हे मात्र खरेआहे .
राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सातारा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत शिवसेनेच्या मेळाव्या बाबत यशस्वी मेळावा होईल. असे सांगून आजाद शिवसैनिकांचा आजाद मैदानावरील मेळावा असे त्याचे वर्णन केले होते. या पत्रकार परिषदेला शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव, चंद्रकांत जाधव ,माऊली शेलार, एकनाथ ओंबळे, संदीप पवार, वासुदेव माने, महेश गोडसे, बाळासाहेब जाधव, प्रताप माने यांच्यासह निलेश मोरे व मान्यवर मंडळ उपस्थित होते. तर दुसऱ्या बाजूला शिवसेनेचे गटनेते नितीन बानुगडे पाटील, रमेश बोराटे, बाळासाहेब शिंदे, जितेंद्र सपकाळ, युवराज पाटील, शहाजीराजे गोडसे, यांनी राम मेळाव्याला उपस्थित राहण्याचा निर्धार केला आहे. त्यांचे कौतुक होत आहे.
——————————————
फोटो –

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button