आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खटाव:-भूषणगडच्या हरणाईदेवीची उद्या यात्रा.

 पत्रकार अक्षय अवघडे खटाव तालुका क्राईम रिपोर्टर

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार अक्षय अवघडे खटाव तालुका क्राईम रिपोर्टर

भूषणगडच्या हरणाईदेवीची उद्या यात्रा.

खटाव. भूषणगड दि.22.10.23 रोजी हरणाईदेवी यात्रा सुरु होत आहे महाराष्ट्र,कर्नाटक, केरळ, गुजरात, मध्यप्रदेश आदी राज्यातील अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या खटाव तालुक्यातील भूषणगड येथील श्री क्षेत्र हरणाई देवीचा यात्रा मोहत्सव सालाबादप्रमाने घटस्थापने पासून दुर्गाष्टमीपर्यंत चालतो दुर्गाष्टमिला गडावर मोठी यात्रा भरते यामध्ये घटस्थापनेपासून सात दिवस गडावर अखंड हरीणाम सप्ताह, हरिभक्त पारायण, भजन, कीर्तन कार्यक्रम अखंडपने सुरु असतो यावेळी देवीच्या दर्शनासाठी पंचक्रोशीतील चोराडे, शेनवडी, होळीचगाव, निमसोड, वांझोळी, राहटणी, महासुर्णे, वडूज, पळशी, भूषणगड ग्रामस्थ येथील अनेक भाविक भक्त मोठया संख्येने गडावर उपस्थित असतात . पालखीवर करणार पुष्पवृष्टी या वर्षीही भूषणगडावरील श्री हरणाई देवीच्या यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये काकड आरती, हरिपाठ ,भजन,कीर्तन देवीचा जागर आदी धार्मिक कार्यक्रम सुरु आहेत रविवार हा यात्रेचा मुख्य दिवस असून या दिवशी सकाळी देवीची पूजा, आरती, काल्याचे कीर्तन होणार असून देवीच्या सजवलेल्या पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन हरणाई देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button