आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

मायणी:-24/7 पिण्याच्या पाण्याची वर्क ऑर्डर मिळाल्याने नागरिकात समाधानाचे वातावरण.

प्रतिनिधी प्रा. दिलीप पुस्तके सातारा:-9890318605

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

24/7 पिण्याच्या पाण्याची वर्क ऑर्डर मिळाल्याने नागरिकात समाधानाचे वातावरण.

मायणी प्रतिनिधी मायणी या निम शहराचा पाणी प्रश्न सुमारे पाच दशके रेंगाळलेला होता 1985 साली येरळा नदी हा उद्भव धरून खातवळसह बारा गावची प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना मंजूर झाली प्रत्यक्षात कामाला सुरुवात होऊन एक वर्षात काम पूर्ण झाले परंतु नंतर या योजनेचे दोष दिसू लागले कधी मोटर जळणे तर कधी विद्युत पुरवठा न होणे यामुळे मायणी गावाला पिण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललेला होता ही गरज लक्षात घेऊन खटावचे माजी आमदार दिलीपराव येळगावकर व युवा नेते सचिन गुदगे यांच्या अथक प्रयत्नामुळे टेंभू योजना हा उदभव धरून 24 बाय सात ही योजना मंजूर होऊन या योजनेची वर्क ऑर्डर मिळाल्याने नागरिकात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे मायणी परिसरात असणाऱ्या शिंदेवाडी यलमर वस्ती नंदीवाले वस्ती लक्ष्मी नगर या भागात देखील 24 तास पाणीपुरवठा होणार आहे तसेच सदरची योजना ही सौरऊर्जेवर असल्याने ग्रामपंचायतीला वीज बिलाचा फटका बसणार नाही ही योजना येत्या मी अखेर पूर्ण होणार आहे तसेच पहिले 28 महिने ही योजना ठेकेदार चालवणार असल्याने मायनी ग्रामपंचायतीला कसलाही कर भरावा लागणार नाही 2021 मध्ये टेंभूचे पाणी महिने तलावात आल्याने व हा तलाव पूर्णपणे भरून घेतल्याने मायनीच्या बागायती क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून लाखो हेक्टर उसाची लागण झाले आहे त्यामुळे मायणी बाजारपेठेतील धंदे जोरात सुरू झाली आहेत आता तर 24 बाय सात ही योजना येणार असल्याने नागरिकात समाधानाचे वातावरण पसरले आहे

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button