क्राईम न्युजग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्रीरामपूर स्थानिक गुन्हे शाखेची जोरदार कामगिरी गावातुन निघाली वाजत गाजत मिरवणुक.

पत्रकार संजय पगारे श्रीरामपुर तालुका अध्यक्ष:-9921180022

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

पत्रकार संजय पगारे श्रीरामपुर तालुका अध्यक्ष

श्रीरामपूर स्थानिक गुन्हे शाखेची जोरदार कामगिरी गावातुन निघाली वाजत गाजत मिरवणुक.

श्रीरामपुर Rps स्टार न्युज . नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक बी. जी शेखर व कर्तव्यदक्ष एस पी राकेश ओला यांच्या सखोल मार्गदशनाखाली कठोर परिश्रम करणारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर व त्यांच्या सहकाऱ्यांनी जोरदार कामगिरी करत आपल्या यशस्वी कारकीर्दीचा झेंडा फडकविला आहे . कारणही तसेच आहे शिर्डीत एकाच रात्री सासरा . चुलत सासू . पत्नी व अन्य अशा चौघांची धारदार चाकुने भोसकून हत्या करण्यात आली . याचा तपास तातडीने स्थानिक गुन्हे शाखेने सुरु केला
शिर्डी पोलीस यांनीही त्यात सहभाग घेत आरोपी जावई सुरेश निकम व चुलत भाऊ रोशन निकम या दोघांना काही तासात अटक केली तर श्रीरामपुर तालुक्यातील एकलहरे येथे दरोड्याचा बनाव करून नवरा नईम पठण याचा गळा आवळून खून करणारी त्याची पत्नी बुसरा पठान हिचाही दरोड्याचा बनव उघडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखेने कौतुकास्पद कामगिरी केली . त्यामुळे तालुक्यात
दरोड्याच्या वृत्ताने घाबरट पसरलेली असतानाच पत्नी कडुनच हा खुन झाल्याचे उघड झाल्याने जनतेनेही सुटकेचा निश्वास घेतला तिसरीकडे शेवगांव तालुक्यातील अमरापुर येथील प्रसिद्ध रेणुका माता मंदिरातील देवीच्या अंगावरील दागिनेच चोरट्यांनी चोरून नेले होते त्यामुळे भाविकांमध्ये प्रचंड तणाव संताप होता .
देवीचे भक्तगण इतके आनंदी झाले कि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर व त्यांच्या पथकाची गावातुन वाजत गाजत मिरवणुक काढुन . फटाकडे फोडुन . त्यांना फेटे बांधून . त्यांना 51 हजार व 11000 ची रोख बक्षीस देऊ केले . मात्र पोनि आहेर यांनी ही बक्षिसाची रक्कम खेळाडु महिला पोलिसात देऊ केली.
ग्रामस्थांनी । G बी जी शेखर पाटील व एस पी राकेश ओला यांचे विशेष अभिनंदन केले . गेल्या आठ दिवसात पकडले . पंधरा वर्षापासुन खुनात फरार असलेला आरोपी विष्णू पवळे याला अटक केली अपघाताचा बनाव करून तीस लाखाचा लसुन चोरणाऱ्या दोघा परप्रांतीयांना पकडले . तोफखाना . कोतवाली नेवासा पोलीसात दाखल गुन्हातील सात फरार आरोपी गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले . दोन राहणार – घोडेगाव याला जेरबंद केले
एकंदरच । G बी जी शेखर पाटील व एस पी राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेची . दिलेली धुरा पोनि दिनेश आहेर यांनी सार्थ ठरवत धडाकेबाज कामगिरी सुरु केली आहे म्हणुनच पोलिसांची ही कामागिरी करू शकतात हेच या आठ दिवसाच्या कामगिरीतुन समोर येथे असे म्हटले तर वावगे ठरू नये .

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button