आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा:-शाहूपुरी येथील श्री गणेश महिला गणेशोत्सव मंडळाच्या आरतीला गर्दी.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा 9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा 9922241299

शाहूपुरी येथील श्री गणेश महिला गणेशोत्सव मंडळाच्या आरतीला गर्दी.

सातारा : कोणतेही शुभकार्य करताना लक्ष्मीची पावले व गणेशाचे पूजन करतात. गंगासागर कॉलनी, शाहूपुरी येथील श्रीगणेश महिला गणेशोत्सव मंडळाने महिलांच्या हस्ते यंदाच्या गणेशोत्सवाला शुभारंभ केलेला आहे. त्याचे सर्वत्र कौतुक होत असून सर्वधर्मीय महिलांच्या या उपक्रमाने समाजात एक आदर्श निर्माण केला आहे. प्रत्येक कुटूंबातून प्रसाद वाटप करुन याठिकाणी एकात्मतेची भावना रुढ झाली आहे.
शाहूपुरी येथील श्री गणेश महिला गणेशोत्सव मंडळाच्या आरतीला गर्दी होत आहे. याठिकाणच्या महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश येथील महिला उद्योग व्यवसायानिमित्त याठिकाणी स्थायिक झाल्या आहेत. त्यांचाही या उपक्रमाला हातभार लागत आहे. महिला सबलीकरण बाबत आदर्श निर्माण करणार्‍या श्री गणेश महिला गणेशोत्सव मंडळ गंगासागर कॉलनी या ठिकाणी महिलांनीच पुढाकार घेऊन यंदाच्या वर्षी गणेशोत्सव साजरा करण्याचा यशस्वी व धाडसी प्रकल्प राबवला आहे. त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. या मंडळाच्या वतीने आरती तसेच विविध स्पर्धा व प्रसादाचे नियोजन केले जात आहे. महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. उज्वला बाबर, उपाध्यक्षा सौ. संध्या भिडे, सचिव सौ. अमृता माने, खजिनदाि सौ. मेघा चांदणे, सौ. संजीवनी घोरपडे, सौ. रुपाली भोसले, सौ. सीमा पवार, सौ. उर्मिला पवार, सौ. रंजना कदम, निकिता पवार, सौ. योगिता जगताप, सौ. मालन सोनावणे, सौ. चारुशिला म्हस्के, डॉ. रुपाली जाधव, सौ. संगिता शिंदे, सौ. गोडसे, सौ. मोरे, सौ. चौगुले, सौ. करनवर, सौ. महानवर, सौ. बुधावले, सौ. येवले, सौ. साक्षी शेलार वहागांवकर आदी महिला मंडळ यशस्वी कार्यक्रम राबवत आहे. या महिला मंडळाने विविध संस्कृती कार्यक्रम त्याचबरोबर श्री गणरायाची आरती व महिला सबलीकरणाबाबत उपयुक्त उपक्रम राबवले आहेत. या मंडळाला अनेक मान्यवरांनी भेटी देऊन श्री ची आरती केली आहे.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे सर्वच कार्यकर्ते विशेषत: अशोक चौगुले, भारत जगताप, किशोर कदम, शुभम चांदणे, मनोज पवार, गणेश भोसले, सिद्धार्थ म्हस्के, निनाद जगताप, हर्षद भोसले, मुक्ता बाबर, नम्रता घोरपडे, ओमकार कडव, साई जगताप, प्रियदर्शनी जगताप, निर्वेद पवार, राज चांदणे, प्रणव पवार, व त्यांचे सर्व सहकारी परिश्रम घेत आहेत. कार्यक्रमासाठी मस्के गुरुजी मोरे सोनवणे बाबर धनावडे व अनेक श्री गणेश भक्त योगदान देत आहेत. यंदाच्या वर्षी महिला वर्गाने नारीशक्ती वंदन औचित्य साधून संपूर्ण गणेश उत्सव यशस्वीपणे करण्यासाठी योगदान दिलेले आहे.
————————————–
फोटो -श्री गणेश महिला गणेशोत्सव मंडळ गंगासागर कॉलनी शाहूपुरी सातारा येथील श्री ची मूर्ती (सार्थ माने- सातारा)

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button