क्राईम न्युजग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

संभाजीनगर:-मौजमजेसाठी बहिणीच्या घरातच चोरी, साल्याने चोरलेले ३६ लाख पोलिसांनी केले मेहुण्याला परत.

पत्रकार अमोल चव्हाण गंगापूर तालुका संघटक:-7397937231

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 प्रकार अमोल चव्हाण गंगापूर तालुका संघटक

मौजमजेसाठी बहिणीच्या घरातच चोरी, साल्याने चोरलेले ३६ लाख पोलिसांनी केले मेहुण्याला परत.

चार महिन्यांपूर्वी मेहुण्याच्या घरात साल्यानेच हात मारला. साथीदाराच्या मदतीने चोरी केलेल्या ४० लाखांपैकी ३६ लाख रुपये व चोरीच्या पैशातून खरेदी केलेले दागिने पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशाने मेहुण्याला परत केले.

बगतसिंह हरिसिंह (४२, रा. सिडको, वाळूज महानगर) हे सोलापूर- धुळे महामार्गावरील साजापूर फाटा येथे मुकुल गोयल विकास पाइप आणि स्टील या ठिकाणी वसुलीचे काम करतात. चार महिन्यांपूर्वी बगतसिंह यांचा साला दशरथसिंह क्रांतिसिंह (२५, रा. राजस्थान) याने मेहुणा बगतसिंह यांच्या घरातून ४० लाखांची बॅग चोरली होती. या चोरीनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवित आरोपी दशरथसिंह यास मध्य प्रदेशात मौजमजा करताना जेरबंद केले. पोलिस तपासात दशरथसिंह याने प्रदीपकुमार जगदीश जोशी याच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली होती. यानंतर पोलिस पथकाने प्रदीपकुमार जोशी यास ताब्यात घेतले होते. आरोपी दशरथसिंह व प्रदीपकुमार यांच्या ताब्यातून पोलिसांनी ३५ लाख ८० हजार रुपये जप्त केले होते. उर्वरित पैशातून या दोघा आरोपींनी सोन्याच्या दोन अंगठ्या, दोन सोन्याच्या चेन व मोबाइल खरेदी केले होते.

पोलिसांनी मेहुण्याला ३६ लाख केले परत
आरोपीच्या ताब्यातून जप्त केलेले ३५ लाख ८० हजार रुपये न्यायालयाने मूळ मालक मेहुणा बगतसिंह यांना परत देण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलिस आयुक्त मनोज लोहिया, उपायुक्त नितीन बगाटे, सहा. आयुक्त अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश आघाव, दुय्यम निरीक्षक गणेश ताठे, सहा. फौजदार कडू, पेद्दावाड, पोहेका. राजाभाऊ कोल्हे यांनी फिर्यादी बगतसिंह यांना ३५ लाख ८० हजार रुपये तसेच चोरीच्या पैशातून खरेदी केलेले दागिने व मोबाइल परत दिला. पोलिसांमुळे चोरी झालेला ऐवज परत मिळाल्याने बगतसिंह यांनी पोलिसांचे आभार मानले.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button