संभाजीनगर:-भरधाव टेम्पाेच्या धडकेतगर्भवती बहीण, भाऊ ठार; इसारवाडी फाट्याजवळ झाला भीषण अपघात.
पत्रकार अमोल चव्हाण गंगापूर तालुका संघटक:7397937231

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार अमोल चव्हाण गंगापूर तालुका संघटक
भरधाव टेम्पाेच्या धडकेतगर्भवती बहीण, भाऊ ठार; इसारवाडी फाट्याजवळ झाला भीषण अपघात.
पाच महिन्यांच्या गर्भवती बहिणीला घरी नेणाऱ्या भावाच्या दुचाकीला भरधाव आयशर टेम्पाेने पाठीमागून जोरात धडक दिली. यात दोघे बहीण-भाऊ तब्बल २० फूट हवेत फेकले जाऊन ठार झाले. हा भीषण अपघात शुक्रवारी दुपारी चार वाजता इसारवाडी फाट्याजवळ घडला. सिराज निजाम शेख (२२, रा. चैतन्यनगर, पडेगाव) तर नमेरा बेगम साबेर शेख (२०, रा. म्हसोबानगर, वैजापूर) अशी मृत भावंडांची नावे आहेत.
पडेगावातील शेख निजाम यांची मुलगी नमेरा बेगम ही वैजापूर येथे सासरी राहते. तिचे एक वर्षापूर्वी लग्न झाले असून ती पाच महिन्यांची गर्भवती होती. शुक्रवारी सकाळी सिराज बहिणीला घेण्यासाठी सासरी गेला. दाेघेही दुचाकीने (एमएच २० एफक्यू २१२७) पडेगावच्या दिशेने निघाले. दुपारी ४ वाजता इसारवाडी फाट्याजवळील हॉटेल गोविंदासमोर पाठीमागून भरधाव आलेल्या आयशरने (एमएच ०४ डीके १५३३) त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना नागरिकांनी घाटीत दाखल केले. अपघातानंतर आयशरचालकाने दुभाजकावरील पोलला धडक दिली. नंतर चालक घटनास्थळी वाहन साेडून पळून गेला. घटनेची माहिती मिळताच वाळूज ठाण्याचे सहायक फौजदार कारभारी देवरे यांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही वाहने ताब्यात घेतली.
घाटीत उपचार सुरू असताना निधन
गंभीर जखमी सिराज व नमेरावर घाटीतील अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना त्यांचा रात्री आठ वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. मृत सिराज सेंट्रिंगचे काम करत हाेता. मुलगी, मुलाचा मृत्यू झाल्याने आई-वडिलांना माेठा धक्का बसला आहे