फलटण:-ओला दुष्काळ जाहीर करुन अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या सर्व शेतकऱ्यांना सरसकटपणे हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी :- अनिलकुमार कदम
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
ओला दुष्काळ जाहीर करुन अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या सर्व शेतकऱ्यांना सरसकटपणे हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी :- अनिलकुमार कदम

फलटण (सातारा):- महाराष्ट्र राज्यातील सर्व भागात खुप मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने अतोनात नुकसान झाले आहे.अतिवृत्ती सतत संततधार पावसामुळे पिकांचे फळबागा भाजीपाला शेतजमीन पशुधन कुक्कुटपालन मधमाशी शेळ्या मेंढ्या कोंबड्या यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.याचा विचार होवून ओला दुष्काळ जाहीर करावा व हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.
अभुतपर्व असाधारण नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान झाले आहे.नैसर्गिक संकटात सापडलेल्या महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकटपणे विनाअट हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत दिवाळीच्या पूर्वी खास बाब म्हणून तातडीने मिळावी. अशी मागणी मुख्यमंत्री यांना मेल करून अनिलकुमार बुवासाहेब कदम
संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य एकता क्रांती दल
गिरवी, ता फलटण,जि सातारा. यांनी केली आहे.




