क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

वाई:-मदनदादांच्या पुढाकाराने जमा झाली तब्बल दोन लाखांची मदत.

पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा PRR:-9146190215

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
 पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा PRR

मदनदादांच्या पुढाकाराने जमा झाली तब्बल दोन लाखांची मदत.

वाई : शिवछत्रपती पुरस्कार मिळाला तरी पुढील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील वाटचालीची आर्थिक अडचण मात्र कायम. अशा परिस्थितीत ज्यांनी पहिलं पाऊल टाकताना हात दिला तेच हात पुन्हा एकदा पुढे सरसावले. त्या कृतीतून शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल सन्मान केलाच शिवाय १ लाख ६० हजारांची आर्थिक मदतही केली. पुरस्कार मिळूनही वाटेत असणार्‍या अडचणी दूर होण्यासाठी असा भक्कम आधार मिळाला तो शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त स्नेहल मांढरे हिला. मदतीचे हात लाभले ते मदनदादा भोसले यांच्या पुढाकाराने जनता शिक्षण संस्था व किसन वीर महाविद्यालयाचे.
दरम्यान, महाविद्यालयाचा आणखी एक शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त विद्यार्थी मयुर रोकडे यालाही ४० हजार रुपये देण्यात आले.

पांडेवाडी, ता. वाई येथील स्नेहल विष्णू मांढरे ही किसन वीर महाविद्यालयाची विद्यार्थिनी. याच महाविद्यालयात शिकत असताना तीने धनुर्विद्या क्रीडा प्रकारात सरावाला सुरुवात केली. याच महाविद्यालयात शिकत असताना तीने विविध स्पर्धांत यशस्वी कर्तबगारी दाखविण्यास सुरुवात केली. त्यावेळी सुरुवातीच्या स्पर्धेवेळीच तिच्या समोर आर्थिक अडचणींचा डोंगर उभा राहिला. अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातील या विद्यार्थिनीची कर्तबगारी केवळ आर्थिक अडचणीच्या कारणाने थांबू नये यासाठी त्याचवेळी प्रतापराव भोसले भाऊ व मदनदादा भोसले यांनी तिला सर्वप्रथम आर्थिक मदतीचा हात दिला.

त्यानंतर स्नेहल मांढरे अनेक स्पर्धा गाजवत महाविद्यालयाचे, तालुक्याचे, जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर चमकवले. तिच्या त्याच कर्तबगारीचा सन्मान राज्यशासनाच्या मानाच्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने झाला. राज्यपालांच्या हस्ते नुकताच पुण्यात तो पुरस्कार तिला प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मिळाला तरी स्नेहलसमोरील आर्थिक अडचणी मात्र कायम आहेत. यापुढेही तिला राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर आणखी उंच भरारी घ्यावयाची आहे. त्यासाठी उत्तम दर्जाचे धनुष्य घेण्यासाठी तिला १ लाख ६० हजार रुपये कमी पडत होते. याची माहिती समजताच जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मदनदादा भोसले यांनी पुढाकार घेत, प्रथमतः स्वतःच्या रकमेची भर टाकत जनता शिक्षण संस्थेतील पदाधिकारी, किसन वीर महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि इतर सहकार्‍यांच्या माध्यमातून स्नेहलला १ लाख ६० हजारांचा मदतनिधी दिला. डॉ. प्रशांत कुलकर्णी यांच्या हस्ते जेव्हा स्नेहलला मदतीची रोख रक्कम दिली त्यावेळी स्नेहल भावूक झाली. मदनदादा भोसले व महाविद्यालयाने मदत करीत दाखविलेला हा विश्वास सार्थ करेन अशी ग्वाही देत तीने सर्वांचे आभार मानले.
यावेळी महाविद्यालयाचा आणखी एक शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त विद्यार्थी मयुर रोकडे यालाही मदतीची गरज असल्याचे दादांना समजताच, त्यांनी उपस्थित सहकारी कार्यकर्त्यांना आवाहन केले. यावेळीही दादांनी स्वतःपासून मदतीला सुरुवात केल्याने अगदी एक मिनिटातच ४० हजार रुपये जमले. त्याक्षणी मयुर महाविद्यालयात परीक्षा अर्ज भरण्यासाठी आल्याचे दादांना समजताच, त्यांनी मयुरला बोलवून, त्याला शुभेच्छा दिल्या व चाळीस हजारांचा गौरव मदत निधी त्याला सन्मानपूर्वक देण्यात आला.

यावेळी बोलताना मदनदादा भोसले यांनी सांगितले, की स्नेहल मांढरे ही केवळ महाविद्यालयाचे नव्हे तर वाई तालुक्याचे व सातारा जिल्ह्याचे भूषण आहे. एवढ्या कमी वयात तिने व मयुरने शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराला घातलेली गवसणी अभिमानास्पद आहे. यापुढील काळातही तिच्या प्रत्येक वाटेवर आम्ही सर्वजण तिच्यासोबत आहोत.

यावेळी संस्थेचे खजिनदार नारायण चौधरी, प्राचार्य गुरुनाथ फगरे, किसनशेठ भिलारे, रोहिदास पिसाळ, दीपक ननावरे, प्रविण जगताप, सचिन भोसले – पाटील, संतोष जमदाडे, नाना कायंगुडे, सुनील तात्या कदम, चंद्रकांत मातारे, प्रमोद डेरे, बाळासाहेब टेमकर, मधुकर शिंदे, जितेंद्र चव्हाण, महेंद्र कोळी, नितीन केसकर, संदीप कदम, सुनील जंगम, अनिल लाखे आदी उपस्थित होते. दरम्यान, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार स्विकारल्यानंतर प्रथमच महाविद्यालयात आलेल्या स्नेहलचे महाविद्यालयात जल्लोषात स्वागत करण्यात आले.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button