मावळ:-मावळ तालुक्यातील भूमिपुत्राला जम्मू कश्मीर येथे वीरमरण मावळा तालुक्यावर शोककळा.
पत्रकार धर्मेंद्र ठाकर मावळ:-9960044802

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार धर्मेंद्र ठाकर मावळ:-9960044802
मावळ तालुक्यातील भूमिपुत्राला जम्मू कश्मीर येथे वीरमरण मावळा तालुक्यावर शोककळा.
मावळ तालुक्यातील ओझर्डे गावातील भूमिपुत्र दिलीप बाळासाहेब ओझरकर वय ३८ यांना जम्मू कश्मीर येथे लेह ते लडाखमधील सीमेवर रविवार दि.३ रोजी वीर मरण आले. त्यांच्या पार्थिवावर आज मंगळवार दि.५ रोजी पुण्यातील धोबीघाट येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
ओझरकर हे मावळ तालुक्यातील ओझर्डे गावातील रहिवाशी असून सध्या पुणे येथे भवानी पेठेत भवानी माता मंदिराजवळ वास्त्यव्यास होते. ते मिडीयम रेजिमेंट आर्टिलरी युनिट -९४ मध्ये हवालदार पदावरून सैन्य दलातून निवृत्त देखील झाले होते. परंतु त्यांनी पुन्हा कालावधी वाढवून देशप्रेमापोटी. भारत मातेच्या रक्षणासाठी पुन्हा सेवा वाढवून घेऊन देशसेवेला प्राधान्य दिले होते.
ते सराव मोहिमेसाठी जाताना रविवार दि.३ रोजी त्यांच्या वाहनाचा अपघात झाला. आणि या अपघातात ते हुतात्मा झाले त्यांचे पार्थिव रात्री उशिरा विमानाने लोहगाव विमानतळावर आणण्यात आले. त्यांच्या मागे आई वडील बायको, एक मुलगा आणि एक मुलगी व दोन भाऊ असा मोठा परिवार आहे.
पप्पा तुम्ही कधी येणार ?
रविवारी सकाळीच त्यांचे फोनवर त्यांच्या मुलांशी बोलणे झाले होते. पप्पा तुम्ही कधी येणार ? अशी विचारणा मुले करत होती तेव्हा त्यांनी भारत पाक सीमेवर असल्याचे व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून दाखवल्याची माहती भाऊ रोहित ओझरकर यांनी दिली .
अतिशय गरीब आणि हलकीच्या परिस्थितीतून अतिशय कष्टाने दिलप ओझरकर हे सैन्य दलात भारती झाले होते.