ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जालना :-शिवशंभू संघटनेच्या वतीने अंतरवाली सराटी येथील उपोषणास जाहीर पाठिंबा.

पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा PRR:-9146190215

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा PRR:-9146190215

दि. 5 शिवशंभू संघटनेच्या वतीने अंतरवाली सराटी येथील उपोषणास जाहीर पाठिंबा देण्यात आला.

तिघाडी सरकार हे जरा अतिच होतय , असं वागणं बरं नव्हं
जालना जिल्ह्यात अंबड तालुक्यामध्ये सराटी अंतरवाली या ठिकाणी मनोज जरांगे पाटील या मावळ्याने २९/०८/२०२२ मराठा आरक्षण बेमुदत अमरण उपोषण उधळून लावण्यासाठी पोलिसांचा मोठा पोस्ट फाटा घेऊन हे आंदोलन चिरडून काढण्यासाठी मराठा समाजातील माता भगिनी लहान मुले वयस्कर माणसे व तरुण बांधव यांच्यावर लाठी हल्ला व गोळीबार करून अनेक बांधव व माता भगिनी जखमे केले.
जगाला आंदोलनाची दिशा देणाऱ्या मराठा समाजावर हल्ला केल्याबद्दल या सरकारचा शिवशंभू संघटनेने जाहीर निषेध केला आहे.
अंतरवली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी लोकशाही मार्गाने उपोषण सूरू असताना जालना पोलीस प्रशासनाने आंदोलन दडपण्याच्या हेतूने अंतरवली सराटी गावातील उपोषण करणाऱ्या मराठा बांधवांवर अमानुषपणे लाठीचार्ज केला आहे तरी मा . मुख्यमंञी एकनाथ शिंदे साहेब आपण या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी , मराठा आंदोलनाकांवर व्देषाच्या भावनेने दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात यावे अन्यथा शिवशंभू संघटनेच्या वतीने महाराष्ट्र भर आंदोलन छेडण्यात येईल त्यास सर्वस्वी सरकार जबाबदार असेही निवेदन शिवशंभू संघटनेच्या वतीने तहसील कार्यालय येथे देण्यात आले.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button