आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा:-निर्माण बहुउद्देशीय विकास संस्थेमार्फत किशोरवयीन मुलींच्या क्षमता बांधणी कार्यशाळेच्या आयोजन.

पत्रकार मारुती सोमुत्ते पुणे जिल्हा उपाध्यक्ष:-7447515129

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार मारुती सोमुत्ते पुणे जिल्हा उपाध्यक्ष

सातारा:-निर्माण बहुउद्देशीय विकास संस्थेमार्फत किशोरवयीन मुलींच्या क्षमता बांधणी कार्यशाळेच्या आयोजन.

निर्माण बहुउद्देशीय विकास संस्था अंतर्गत निर्भया प्रकल्प सातारा यांच्या माध्यमातून बालकांचा क्षमता बांधणी कार्यशाळेचे आयोजन 2 सप्टेंबर 2023 ते 3 सप्टेंबर 2023 रोजी सेवा सामाजिक संस्था हॉल, कदम पेट्रोल पंप शेजारी, राधिका रोड, सातारा येथे सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत करण्यात आले. सदरच्या कार्यक्रमास बालकल्याण समिती सातारा च्या माजी अध्यक्षा व साताऱ्यातील नामांकित वकील अॅड. मनीषा बर्गे मॅडम ह्या उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे व उपस्थित किशोरवयीन मुलींच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी मुले आणि मुली यांच्या शारीरिक व मानसिक समस्या, वस्ती मधील असुरक्षित जागा, चाइल्ड लाईन हेल्पलाइन नंबर १०९८ , सुरक्षित व असुरक्षित स्पर्श, अत्याचार होत असेल तर काय करावे? नाही कसे म्हणायचे? बालकांचे हक्क आणि अधिकार, बाल सुरक्षा समिती या विषयावर चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी मुलींना व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून बालकामगार संकल्पना, मुलांसोबत होणारे अन्याय अत्याचार, मूल म्हणजे काय? मुलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराचे प्रकार, लैंगिक अत्याचार व्याख्या, स्पर्शाने आणि स्पर्शा शिवाय होणाऱ्या अत्याचार, अत्याचार/ गुन्हा कोण करू शकतो? गुन्हा कसा होतो? मुले का बोलत नाही? अत्याचार झालेल्या मुलांमध्ये आढळणारी लक्षणे, लैंगिक गुन्ह्यापासून मुलांचे संरक्षण कायदा २०१२, मुलींसाठी काम करणाऱ्या शासकीय यंत्रणाबद्दलची माहिती आणि बालकल्याण समिती अंतर्गत मदतनीस व्यक्तीची नेमणूक व त्याची भूमिका या विषयांवर चर्चा वर मार्गदर्शन करण्यात आले.

सदरच्या कार्यशाळेसाठी अॅड. मनीषा बर्गे, निर्माण संस्थेचे जिल्हा समन्वयक श्री विक्रांत मोरे, सायली पडवळ, सुचिता सातपुते, रमेश पुजारी, नम्रता खरात, चांदणी चंदनशिवे व विद्या गडकरी उपस्थित होत्या. तसेच चार भिंती, कामाठीपुरा, मंगळवार पेठ, आकाशवाणी, मतकर झोपडपट्टी आणि म्हसवे या सातारा व आसपासच्या परिसरातील भटके विमुक्त समाजातील ६० पेक्षा जास्त किशोरवयीन मुली व पालक उपस्थित होते.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button