खटाव:-सहकार उप निंबधक कार्यालयात कमी पैसे भरून दाखवली मतमोजणीची चूक.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
सहकार उप निंबधक कार्यालयात कमी पैसे भरून दाखवली मतमोजणीची चूक.
वडूज दि:
वडूज शेती उत्पन्न बाजार समितीच्या अटीतटीच्या निवडणुकीच्या मतमोजणीच्या कालावधीमध्ये फेर मतमोजणी मध्य एका मताचा फरक जाणवला. सदरचा फरक जाणवण्यासाठी पराभूत उमेदवारालाच पैसे मोजावे लागले. त्यामुळे खटाव तालुक्यातील सहनिबंधक सहकार कार्यालयातील कारभार पुढे आला आहे. याची सखोल चौकशी व्हावी. अशी मागणी होत आहे.
याबाबत माहिती अशी की, राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेल्या वडूज शक्ती उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालक पदासाठी निवडणूक झाली होती. या वेळेला मतमोजणी करण्यासाठी खटाव तहसील कार्यालयातील मतमोजणी केंद्रात सर्व पॅनल प्रमुख व उमेदवार तसेच त्यांचे प्रतिनिधी व समर्थक पत्रकार यांनी मोठी गर्दी केली होती. सोसायटी मतदारसंघातील ११ ग्रामपंचायत मतदार संघातील ४ व्यापारी व हमाल मापारी प्रत्येकी १, महिला २ आर्थिक दृष्ट्या दुर्बल,१ भटक्या विमुक्त जाती१ अनुसूचित जाती जमाती१ अशा मतदारसंघातील मतमोजणी घेण्यात आली. परंतु अनुसूचित जाती जमातीतील शेतकरी विकास पॅनलचे शैलेंद्र वाघमारे यांना ५४३ व त्यांचे प्रतिस्पर्धी खटाव विकास आघाडीचे अमरजीत कांबळे यांना ५४० मते पडली होती. याबाबत धनंजय चव्हाण यांनी लेखी अर्ज करून अनुसूचित जाती जमातीतील मतमोजणी पुन्हा करावी. अशी रास्त मागणी केली होती. त्यासाठी दहा हजार रुपये भरण्याची सूचना केली होती. पण, एवढी रक्कम कोणी भरली नाही.
सदर फेर मतमोजणीसाठी काही रक्कम भरावी अशी सूचना देण्यात आली होती. त्याबाबत तातडीने कार्यकर्त्यांनी रक्कम गोळा करून ती जमा केली. त्यानंतर टेबल वर मते मांडून फेर मतमोजणी घेण्यात आली. त्यानंतर दुबारा मतमोजणी केल्यानंतर शैलेश वाघमारे यांना एक मत अधिक पडलेले त्यांची संख्या ५४४ झाली. ही सर्वानुमते मान्य केली. तसेच सर्वांच्या सह्या घेण्यात आल्या. परंतु, इन कॅमेरा तसेच सहकार विभागाचे अधिकारी कर्मचारी असताना एक मताचा फरक होणे म्हणजे मतमोजणी कामकाज चव्हाट्यावर आल्याची टिका होऊ लागली आहे. सदर बाबी बाबत कोणीही वाच्यात करू नये. अशी विनंती केल्यामुळे ही बाब निदर्शनास आली नसली तरी राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेल्या अशा निवडणुकीमध्ये जागृतीने मतमोजणी व्हावी अशी अपेक्षा होती. परंतु, आता एक मताचा फरक झाल्यामुळे नेमकी कोणावर कारवाई होणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे. लवकरच राज्याचे सहकार मंत्री तथा सहकार सचिव यांची भेट घेऊन या सर्व प्रकरणाची सकल चौकशी करावी .अशी मागणी करण्यात येणार असल्याचे नाव न सांगता एका कार्यकर्त्यांनी सांगितले. त्यामुळे संबंधित विभागात खळबळ माजली आहे.
———-&—————————————————–
फोटो – वडूज शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक मतदान प्रक्रियेमध्ये फेर मतमोजणी करताना,,,,,