खटाव :-पुसेसावळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला दोन वैद्यकीय अधिकारी नियुक्त करण्यासाठी मान्यवरांकडून निवेदन.
पत्रकार अक्षय अवघडे खटाव तालुका क्राईम रिपोर्टर:-7499265724

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार अक्षय अवघडे खटाव तालुका क्राईम रिपोर्टर
खटाव :-पुसेसावळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला दोन वैद्यकीय अधिकारी नियुक्त करण्यासाठी मान्यवरांकडून निवेदन.
पुसेसावळी प्राथमिक आरोग्य केंद्राला दोन वैद्यकीय अधिकारी नियुक्त आहेत या दोन्ही अधिकाऱ्यांची बदली झालेली आहे त्यामुळे सध्यपरिस्थितीमध्ये पुसेसावळी व पुसेसावळी परिसरातील गोरगरीब सर्वसामान्य रुग्णांना वैद्यकीय उपचाराबाबत मोठी कसरत करावी लागत असून मानसिक त्रासाला व आर्थिक भुर्दंडाला सामोरे जावे लागत आहे त्याची दखल घेऊन आज सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. ज्ञानेश्वर खिलारे साहेब यांना वर्धन ऍग्रो कारखान्याचे कार्यकारी संचालक पुसेसावळी जि.प.गटाचे युवा नेते विक्रमबाबा कदम, पुसेसावळीचे माजी सरपंच ज्ञानेश्वर पवार (माऊली ), माजी ग्रामपंचायत सदस्य नितीन वीर भैय्या,अमोल दादा कदम,सामाजिक कार्यकर्ते महेशदादा पाटील यांनी लवकरात लवकर पुसेसावळी प्राथमिक आरोग्य केंद्राला दोन्ही वैद्यकीय अधिकारी नियुक्त करणेबाबतचे निवेदन सादर केले.
श्री.खिलारे साहेबांनी येत्या आठ ते दहा दिवसात पुसेसावळी प्राथमिक आरोग्य केंद्राला दोन्ही नवीन वैद्यकीय अधिकारी नियुक्त केले जातील अशी ग्वाही दिली तसेच चालू परिस्थितीमध्ये सुद्धा गोरगरीब रुग्णांच्या वैद्यकीय उपचारासाठी कोणती अडचण येणार नाही त्यासाठी योग्य ते नियोजन केले जाईल असे आश्वासन दिले.