दहिवडी:-बिजवडी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रस्ता रोको.
पत्रकार अक्षय अवघडे खटाव तालुका क्राईम रिपोर्टर:-7499265724

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार अक्षय अवघडे खटाव तालुका क्राईम रिपोर्टर
खटाव माण स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने चारा डेपो, पाण्याचे टँकरचां अपुरा पुरवठा, पुरेसे पाणी घेऊन टँकर न जाणे, विजेचे अघोषित भारनियमन, कांद्यावरील निर्यात शुल्क मागे घ्या आणि मान खटाव तालुके दुष्काळी जाहीर करा, पीकविमा तातडीने अदा करा. या आणि इतर मागण्यासाठी फलटण आणि दहिवडी राज्य मार्गावर बिजवडीमध्ये रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे वाहनाच्या दोन तीन किलोमीटर वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. या प्रश्नावर तातडीने मार्ग निघाला नाहीतर येत्या पंधरा दिवसांत प्रांत कार्यालयावर गुरेढोरे घेऊन बिऱ्हाड मोर्चा काढण्याचां निर्धार स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जाहीर केला.
यावेळी राज्य प्रवक्ते अनिल पवार, राज्य प्रदेश सरचिटणीस सूर्यभान जाधव, खटाव तालुकाध्यक्ष दत्तुकाका घार्गे, खटाव माण संपर्कप्रमुख शरद शेठ खाडे, तालुका संघटक संतोष तुपे, यांच्याशिवाय जिल्हाप्रसिध्दी प्रमुख केशव जाधव, मान तालुकाध्यक्ष राजू मुळीक, वैभव पाटील, संतोष बागल, अजय पाटील, सत्यवान मोहिते, रवींद्र पाटील, पांडुरंग फडतरे, संतोष रासकर विजय माने, राजाराम देशमुख, विठ्ठल देशमुख, शंकर देशमुख , दादासाहेब शिनगारे, केशव जाधव, दादासो भोसले, संतोष भोसले यांचेसहबिजवडी शाखेचे सगळी टीम यांच्यासह कातरखटाव, पेडगाव, बोंबाले विखळे आदी गाव स्वाभिमानी टीम चे पदाधिकारी उपस्थित होते.
या आंदोलनाला रासपचे विरकर, राष्ट्र वादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष प्रशांत विरकर, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष भोसले यांच्यासह अनेक शेतकरी, दूध उत्पादक उपस्थित होते.