आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोरेगाव:-श्री गाडगे महाराज आश्रमशाळा ब्रह्मपुरी परिवारातील श्री. विठ्ठल बाविस्कर (मामा) व श्री. मधुकर घाडगे ( भाऊ) यांचा सेवानिवृत्तीनिमित्त शुभचिंतन कार्यक्रम संपन्न.

पत्रकार आकाश जाधव खटाव तालुका उपाध्यक्ष:-7057706113

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार आकाश जाधव खटाव तालुका उपाध्यक्ष

श्री गाडगे महाराज आश्रमशाळा ब्रह्मपुरी परिवारातील श्री. विठ्ठल बाविस्कर (मामा) व श्री. मधुकर घाडगे ( भाऊ) यांचा सेवानिवृत्तीनिमित्त शुभचिंतन कार्यक्रम संपन्न.

श्री गाडगे महाराज आश्रमशाळा ब्रह्मपुरी येथील माध्यमिक विभागात कार्यरत असणारे श्री. विठ्ठल बाविस्कर आणि श्री. मधुकर घाडगे आज नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असल्याने त्यांचा शुभचिंतन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमापूजनाने झाली.

यावेळी आश्रमशाळेतील विद्यार्थीनींनी सादर केलेल्या संदेशगीत आणि स्वागतगीताने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. मधुसूदन मोहिते पाटील (दादा) आणि माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापक सौ. भारती मोहिते मॅडम यांनी शाल , श्रीफळ , पुष्पगुच्छ आणि संपूर्ण पोशाख देवून आजच्या सत्कारमूर्ती श्री. विठ्ठल बाविस्कर मामा आणि श्री. मधुकर घाडगे भाऊ यांचा सपत्नीक सत्कार केला.

माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापक सौ. भारती मोहिते मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना श्री. बाविस्कर मामा आणि मधुभाऊ यांच्या आठवणी सांगितल्या.

सत्कारमूर्ती श्री. बाविस्कर मामा यांनी आपले मनोगत व्यक्त करताना त्यांच्या संपूर्ण सेवाकाळातील प्रवास सांगितला. या आश्रमशाळा परिवाराशी असलेला स्नेहबंध शेवट पर्यंत जपणार असे सांगितले.

आजच्या दुसऱ्या सत्कारमूर्ती श्री. मधुभाऊ यांनी आपले मनोगत व्यक्त करताना वै. ह.भ.प. जिजाबा मोहिते पाटील (बाबा) यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. दादा आणि संपूर्ण ब्रह्मपुरी परीवाराविषयी असणारे जिव्हाळ्याचे संबंध सांगताना अश्रूंना मोकळी वाट करून दिली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय दादांनी आपले मनोगत व्यक्त करताना या मिशन परीवारातील सर्व कर्मचारी माझे कुटुंबीय आहेत त्यांच्या सुखदुःखात मी व संस्था सहभागी असणार आहे असे सांगितले व दोघांनाही सेवानिवृत्ती नंतरच्या जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी विकास बाविस्कर यांनी मनोगत व्यक्त केले. शिक्षक मनोगत श्री. संतोष जाधव सर यांनी केले.

विद्यार्थी मनोगत कु. प्रणिता शिंदे हीने केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. दीपक माने सर यांनी केले.

यावेळी बाविस्कर मामा आणि मधुभाऊ यांचे कुटुंबीय, नातेवाईक, सर्व शिक्षक, अधिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button