कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कराड:-रेठरे बुद्रुक येथील शेतकऱ्याच्या फसवणूक प्रकरणी सहकार आयुक्त कार्यालयाकडे तक्रार.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

रेठरे बुद्रुक येथील शेतकऱ्याच्या फसवणूक प्रकरणी सहकार आयुक्त कार्यालयाकडे तक्रार.

कराड दि: शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून सर्वच राजकीय पक्ष भाषणबाजी करतात. पण, प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यावर होणाऱ्या अन्यायाबाबत लोकशाही मार्गाने दाद मागून सुद्धा न्याय मिळत नाही. त्यामुळे शेतकरी हतबल झालेले आहे. रेठरे बुद्रुक ता. कराड जिल्हा सातारा येथील अल्पभूधारक शेतकरी श्री संपत साळुंखे यांनी आपल्या शेतीच्या अडीअडचणीसाठी रेठरे बुद्रुक (ढगार पाणंद) येथील दहा गुंठे जमीन विकसित करण्यासाठी तसेच टोमॅटो लावण्यासाठी खाजगी सावकारी कडून कर्ज काढले होते. याबाबत शेतकऱ्याच्या फसवणूक प्रकरणी सहकार आयुक्त कार्यालयाकडे तक्रार करण्यात आली आहे. अशी माहिती निवेदनाद्वारे दिली आहे.
या गोष्टीला पाच वर्षे झाली असून एक लाख रुपये कर्जाची रक्कम परतफेड करावी. यासाठी त्या सावकाराने चक्क त्या शेतकऱ्याकडून दहा गुंठे जमीन नोटरी करून पतसंस्थेचे कर्ज काढले व तीन लाख रुपये हडप केल्याची तक्रार शेतकरी संपत विठोबा साळुंखे यांनी विभागीय आयुक्त, पुणे, महानिबंधक ,पुणे व जिल्हाधिकारी, सातारा जिल्हा पोलीस प्रमुख, सातारा यांच्याकडे निवेदनाद्वारे केलेली आहे.
शेतकरी श्री संपत विठोबा साळुंखे यांनी पाच वर्षांपूर्वी ढगार पाणंद रेठरे बुद्रुक येथील दहा गुंठे जमिनीच्या तालीचे रान तयार करणे. तसेच शेती विकासासाठी जे. सी. बी. लावायचा म्हणून कर्ज काढले होते. त्यांनी यासाठी नरसी ता कराड येथील एका व्यक्तीकडे सावकारी एक लाख रुपये व्याजाने कर्ज काढले होते. या सावकाराला जानेवारी २०१९ पर्यंत १,५५ हजार रुपये दिले होते. तरीही त्या सावकाराने आपल्या नातेवाईकांच्या मदतीने सदर जमिनीवर पतसंस्थेचे तीन लाख रुपये कर्ज काढून ही रक्कम स्वतःकडे ठेवून घेतलेली आहे. त्यामुळे सदर शेतकरी आर्थिक अडचणीत आलेले आहेत . असे ही तोंडी तक्रार केली आहे.
त्यांनी याबाबत वेळोवेळी शासकीय कार्यालयाकडे तक्रार केल्याने तसेच संबंधित पतसंस्थेच्या संचालकांवर कारवाई न केल्यास आत्महत्या करण्यास परवानगी मिळावी. असेही पत्र सहकार आयुक्त यांना तसेच पुणे विभागीय आयुक्त उपनिबंधक यांना देण्यात आलेले आहे.
त्यापूर्वी त्यांनी दिनांक १५ ऑगस्ट२०२३ रोजी या बाबत लेखी तक्रार केल्यानंतर संबंधित विभागाकडे कारवाईबाबत उपनिबंधक सहकारी सहकार संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दि:११ ऑगस्ट २०२३ रोजी जावक क्रमांक/ आतील/ सावकारी/ तक्रारी अर्ज साळुंखे/२०२३ / १९३० या पत्रानुसार त्यांना लेखी कळविले आहे. पण अद्यापही ठोस कारवाई होत नसल्याने संबंधित शेतकरी श्री संपत साळुंखे हे हतबल झालेले आहेत. त्यांनी याबाबत न्यायाची मागणी केली असून सुद्धा त्यांना न्याय मिळत नाही. ही शोकांतिका आहे. नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट होत असून त्या शेतकऱ्यांबाबत कळवळा असणारे शेतकरी संघटनेचे नेते यांनी याकडे जाणीवपूर्वक लक्ष घालावे. कारण, गोरगरीब शेतकरी नाढवला जात आहे .आर्थिक अडचणीत असल्यामुळे त्यांना दिलासा देण्याचे काम राजकीय पक्ष करत नसेल तर ते काम शेतकरी संघटनेने करावे. अशी त्यांनी विनंती केली आहे. या शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी आदरणीय शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना व क्रांतिसिंह नाना पाटील संभाजी ब्रिगेड शेतकरी संघटना प्रयत्न करत असून शेतकरी श्री संपत साळुंखे यांना न्याय मिळावा यासाठी शेतकरी संघटनेचे विजय पाटील व धन्यकुमार जाधव प्रयत्न करत आहेत .यापुढे या शेतकऱ्यांबाबत जर अन्याय होऊन ही होऊ शेतकऱ्याला न्याय मिळत नसेल तर शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करून लोकशाही काय असते ? हे दाखवून दिले जाईल. असा इशारा देण्यात आलेला आहे. दरम्यान संबंधित विभागाकडे याबाबत चौकशी केली असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही .संबंधित शेतकऱ्याने फक्त पत्र देण्याचे पोस्टमनचे काम उपनिबंधक कार्यालयातून झाले असून त्यांची जबाबदारी संपली आहे का ? अशा शब्दात शेतकरी संघटनेचे पदाधिकारी जाब विचारणा करू लागले आहेत.
————————————————–
रेठरे बुद्रुक येथील सावकाराच्या जात्याला कंटाळून आत्महत्येची मागणी करणारे शेतकरी श्री संपत साळुंखे

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button