कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

कोपरगाव कृषी मार्केट कमिटीने शेतकऱ्यांच्या मालाचे लिलावा नंतर चोवीस तासात रक्कम अदा न केल्यास प्रहारचा आंदोलनाचा इशारा.

पत्रकार वसंत काळे अहमदनगर जिल्हा सचिव:-9767653309

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

पत्रकार वसंत काळे अहमदनगर जिल्हा सचिव:-9767653309
प्रहार पक्षाचे अध्यक्ष दिव्यांग व मत्रालयचे अध्यक्ष ना. बच्चुभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार जनशक्ती पक्षाचे अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज निवेदन देण्यात आले कोपरगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर शेतकरी आपला माल विक्रिसाठी घेऊन येत असतात.हा माल घेऊन येत असताना शेतकरी हे खूप लांब वरून आपला माल खूप अपेक्षेने घेऊन आलेले असतात.परंतु बाजार समिती मधे मध्ये माल विक्री केल्यानंतर शेतकऱ्याला लगेच त्याचा मोबदला मिळने आवश्यक असताना देखील शेतकरी वर्गाला पैसे लगेच न् देता त्यांना आपल्या व्यापाऱ्यांकडून पंधरा दिवसाची पावती देऊन मग पंधरा दिवसांनी पैसे घेण्यासाठी बोलावले जाते.हि पद्धत एकदम चुकीची आहे.व आपण यावर लवकरात लवकर योग्य कारवाई करून शेतकऱ्यांना लगेच त्यांच्या मालाची रक्कम आठ दिवसात देण्याची कारवाई करावी अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष मा.श्री बच्चुभाऊ कडु याच्या मार्गदर्शनाखाली प्रहारच्या वतीने कोपरगाव कृषी बाजार समिती समोर ढोल बजाओ आंदोलन करण्यात येईल याची नोंद कृषि उत्पन बाजार समितीने घ्यावी असा इशार प्रहार जनशक्ती पक्षाचे अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष संजय शिंदे यांनी दिला व प्रहार पक्षाच्या वतीने दिलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.हे निवेदन देण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष श्री.संजय शिंदे पाटील जिल्हा सघटक अभिजित का लेकर ,कोपरगाव शहर अध्यक्ष दिपक पठारे प्रहारचे कलिम शेख खडकी शाखा अध्यक्ष सुरेश खरात पापा भाई शेख पडेगाव शाखा अध्यक्ष बद्रीनाथ शिंदे सर्व कोपरगाव प्रहार पदाधिकारी,राहाता तालुका अध्यक्ष दिनेशराजे शेळके,श्री.वसंत पा.काळे,विक्रम दाभाडे,किशोर कानकाटे,बबनराव डांगे व इतर राहाता तालुका पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button