पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला उशिरा सुचलेलं शहाणपण-RPS स्टार न्यूजचा पाठपुरावा.
प्रतिनिधी शफिक शेख निगडी:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
प्रतिनिधी शफिक शेख निगडी:-9767275783.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला उशिरा सुचलेलं शहाणपण – RPS स्टार न्यूजचा पाठपुरावा.
पुणे, निगडी, दि. 20 (शफिक शेख):- ‘‘भक्ती-शक्ती चौकामध्ये अनेक ठिकाणी पाणी गळतीने हजारो लीटर पाणी वाया” या मथळयाखाली दि. 12 जुलै रोजी ‘RPS स्टार न्यूज रिपोर्टर’ने बातमी प्रसिद्ध केली होती. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने त्या वृत्ताची दखल घेत सदर दोन्ही ठिकाणची व्हॉल्व्ह दुरूस्त केले.
निगडीमधील भक्ती शक्ती चौकामधील दोन्ही ठिकाणातील पाण्याचे व्हॉल्व्ह गळतीमुळे सुमारे दहा दिवसांपासून पाणी गळती होवून त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया जात होते. त्याची दखल RPS स्टार न्यूज रिपोर्टरने घेवून वृत्त प्रकाशित केले आणि त्या बातमीला न्याय देवून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने सदरील दोन्ही व्हॉल्व्ह दुरूस्त केले.
परंतु या घटनेतून एक प्रश्न जनमानसात फिरत आहे तो हा कि प्रत्येक वेळेस पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अकार्यक्षम कर्मचारी आणि अधिकारी यांच्या प्रत्येक चुकीसाठी सामान्य नागरिकांना किंमत चुकवावी लागेल काय? याची वरिष्ठांनी विचार करण्याची आणि कठोर पावले उचलण्याची नागरिकांमधून मागणी होत आहे.