वाई शहर भाजपच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री मा.ना.शिंवेंद्रसिंह राजे भोसले यांना निवेदन.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
वाई शहर भाजपच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री मा.ना.शिंवेंद्रसिंह राजे भोसले यांना निवेदन.

वाई शहर भाजपच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री मा.ना.शिंवेंद्रसिंह राजे भोसले यांना निवेदन देण्यात आले.
वाई शहर ते एम आय डी सी व शहाबाग फाट्याकडे जाणारा रस्ता गेली वर्षभर खराब अवस्थेत आहे. अनेक वेळा प्रशासनाला तोंडी विनंती करूनही त्याबाबत कसलीही कारवाई होताना दिसली नाही. म्हणून जनतेचा प्रश्न थेट मंत्री महोदयांकडे मांडण्यासाठी वाई शहर अध्यक्ष विजय दादा ढेकाणे हे काही भाजप पदाधिकारी यांना घेऊन भाजप सातारा जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा डॉ. सुरभी ताई भोसले यांच्या नेतृत्वात मा. मंत्री महोदय शिवेंद्र सिंह राजे भोसले यांच्याकडे गेले. वाईतून कामानिमित्त रोज midc मध्ये जाणारे कामगार, आसपासच्या गावातील सर्व नागरिक आणि मांढरदेव गडावर जाणारे भक्त याच रस्त्याने जा ये करतात. तसेच परिसरातील शेतकरी याच रस्त्याचा वापर करतात. परंतु ठेकादाराचा निष्काळजी पणा आणि त्याकडे प्रशासनाचे असलेले दुर्लक्ष यामुळे हा रस्ताच मुळात रहदारी योग्य राहिला नसल्याचे मंत्री महोदय यांना सांगितले. शेकडो हजारो लोकांच्या रोजचा दळणवळणाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याची आग्रही मागणी यावेळी विजय ढेकाणे यांनी केली. मंत्री महोदय यांनी प्रश्न समजावून घेतल्यावर तात्काळ संबंधित अधिकारी यांना फोन लावून या रस्त्याचे काम त्वरित मार्गी लावावे अशा सूचना दिल्या. त्याचबरोबर संबंधित ठेकेदाराला योग्य ती समज देण्याचे आदेशही देण्यात आले.
निवेदन देताना भाजप सातारा जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा डॉ. सुरभी ताई भोसले, वाई शहर अध्यक्ष विजय ढेकाणे, कामगार मोर्चा जिल्हा अध्यक्ष तेजस जमदाडे, वाई उपाध्यक्ष सुनील साठे, विकास जाधव, कोषाध्यक्ष सुधीर भागवत, श्रीकांत कुंभार, युवा मोर्चा अध्यक्ष गणेश जायगुडे, केदार राजपूत उपस्थित होते.निवेदन देताना, डॉ. सुरभी भोसले, विजय ढेकाणे, तेजस जमदाडे, विकास जाधव, सुनील साठे व इतर.




