आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोरेगाव:-श्री गाडगे महाराज आश्रमशाळा ब्रह्मपुरी येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात.

पत्रकार आकाश जाधव खटाव तालुका उपाध्यक्ष:-7057706113

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार आकाश जाधव खटाव तालुका उपाध्यक्ष

श्री गाडगे महाराज आश्रमशाळा ब्रह्मपुरी येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात.

ब्रह्मपुरी येथील श्री गाडगे महाराज आश्रमशाळेत भारतीय स्वातंत्र्याच्या 76 वा वर्धापन दिनानिमित्त श्री गाडगे महाराज आश्रमशाळा ब्रह्मपुरीचे माजी संचालक, स्वातंत्र्यसैनिक जिजाबा मोहिते पाटील सोहोलीकर यांची कन्या श्रीमती विजया जाधव (आत्या) यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री गाडगे महाराज मिशन मुंबईचे चेअरमन मा.श्री. मधुसूदन मोहिते पाटील (दादा) होते. याप्रसंगी श्री गाडगे महाराज आश्रमशाळा ब्रह्मपुरीचे माजी मुख्याध्यापक श्री. एस्. एल्. जाधव सर यांची विशेष उपस्थिती होती .

आश्रमशाळेतील कलामंचातील विद्यार्थीनींनी सादर केलेल्या देशभक्तिपर समूहगीत गायनाने सर्वांना मंत्रमुग्ध केले.

आश्रमशाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते बक्षीस वाटप करण्यात आले. पंचक्रोशी शिक्षण मंडळ रहिमतपूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम सामान्यज्ञान परीक्षेमध्ये सातारा जिल्ह्यातील 700 शाळामधील विद्यार्थी सहभागी झाले होते. त्या परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक मिळवून आमच्या शाळेचे विद्यार्थिनी कु प्रतीक्षा शेंडगे हीने यश संपादन केल्याबद्दल मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.

मा.श्री. एस्. एल्. जाधव सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत श्री गाडगे महाराज आश्रमशाळा ब्रह्मपुरीचे माजी संचालक स्वातंत्र्यसैनिक ह.भ.प. जिजाबा मोहिते पाटील सोहोलीकर (बाबा) आणि सुलोचना मोहिते पाटील (आई) यांच्या प्रेमळ आठवणी सांगितल्या. ब्रह्मपुरीची आश्रमशाळा ही राज्यातील आदर्श आश्रमशाळा आहे असे सांगीतले.

मा.श्रीमती विजया जाधव (आत्या) यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. संत गाडगेबाबा आणि जिजाबा पाटील बाबा यांच्या विचारसरणीला अनुसरून वागले पाहिजे असा संदेश दिला.

श्री गाडगे महाराज मिशन मुंबईचे चेअरमन मा.श्री. मधुसूदन मोहिते पाटील (दादा) यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात आजचा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटक आनंदाने प्रयत्नशील आहे. हे स्वातंत्र्य अनेकांच्या बलिदानाने आणि त्यागाने आपल्याला मिळाले आहे त्यामुळे त्यांच्याप्रती कृतज्ञ राहिले पाहिजे. विकसित भारत देश होण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे असे सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापक सौ. भारती मोहिते मॅडम यांनी केले.

कार्यक्रमासाठी कृष्णकांत बर्गे, बाळासाहेब बर्गे, यमुनाताई देवकर, किरण शिंदे सर, भीमराव भोसले, ॲड.अक्षय शिंदे, दत्तात्रय जाधव, फारूक डांगे, जयश्री साळुंखे, धनंजय जाधव उपस्थित होते.

यावेळी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. दीपक माने सर, सर्व शिक्षक, अधिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आणि विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button