सातारा जिल्हा अध्यक्ष प्रमोद देवाडीगा (RPS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन) यांच्या कन्येचा वाढदिवस हॉटेल पंढरपूरी चहा वर साजरा.
प्रतिनिधि :- प्रल्हाद चव्हाण संपादक

सातारा जिल्हा अध्यक्ष प्रमोद देवाडीगा (RPS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन) यांच्या कन्येचा वाढदिवस हॉटेल पंढरपूरी चहा वर साजरा.प्रमोद देवाडीगा आणि त्यांचा हॉटेल व मित्र परिवार यांनी एकत्र येऊन पंढरपूरी चहा या त्यांच्या व त्यांचे पार्टनर महेश सुभेदार यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. दोन विचार एकमत असे ध्येय घेऊन आज व्यवसायात उत्तरलेले मित्र आदर्श ठरत आहेत. पंढरपूरी चहा हे खवय्येसाठी आकर्षणाच ठिकाण बनलेले आहे. आज तरुणांनी व्यावसायिक क्षेत्रात आपलं अस्तित्व निर्माण करणं हि फार मोठी गोष्ट आहे. पंढरपूर मल्हारपेठ आणि विटा सातारा अशा एकत्र येणाऱ्या चौकात हे हॉटेल उभे आहे. कमी वेळात प्रसिद्धीस आलेले हे हॉटेल साऊत इंडियन आणि महाराष्ट्रीयन नाष्टा तसेच चायनीज च्या उत्कृष्ट चविसाठी नावारूपास आले आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे पंढरपूरी चहा म्हणजे आपल्या जिभेची चवच जात नाही हि या हॉटेलची खासियत आहे. चायनीज साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था, स्वछता खास म्हणजे मालकांचे ग्राहकांशी मनमिळाऊ स्वभाव त्यामुळे एक आगळे वेगळे स्थान मार्केट मध्ये निर्माण केले आहे. काल दि.8जून रोजी आम्हाला प्रमोद देवाडीगा यांच्या मुलीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उपस्थित राहण्याचा प्रसंग आला. त्यामुळे एका सुंदर व्यसयाला आणि व्यवसायिकांना भेटता आले.