सातारा:-साताऱ्यातील आर.टी.ओ. कार्यालयाची ज्येष्ठ नागरिकांनी काढलेला शाब्दिक लाज,,,,
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
साताऱ्यातील आर.टी.ओ. कार्यालयाची ज्येष्ठ नागरिकांनी काढलेला शाब्दिक लाज,,,,
सातारा दि: सातारा शहरातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय म्हणजे आर.टी.ओ.कार्यालय होय.ते भ्रष्टाचाराचे आगार झालेले आहे. प्रत्येक टेबलला किमान शंभर ते पाच हजारापर्यंत टेबलाखालून व्यवहार केल्याशिवाय कामे होत नाही. असा आरोप केला जातो. पण , कधी ही लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांपर्यंत तक्रार दाखल होत नाही.तक्रारी शिवाय कारवाई करता येत नाही.या आरोपाचा पुरावा म्हणून काल साताऱ्यातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात ज्येष्ठ नागरिकांनी कर्मचाऱ्यांच्या केबिनमध्ये जाऊन लाज काढली. आता वरिष्ठ अधिकाऱ्यांना जनाची नाही तरी मनाची लाज राखावी व हा प्रकार थांबवावा अशी मागणी वाहन चालकांनी केलेली आहे.
याबाबत माहिती अशी की, सातारा शहरातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये बऱ्याच कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्याबाबत भरती होत नसल्याने जुन्या कर्मचाऱ्यांच्या वर कामाचा ताण पडतो. या ताणातून आपले काम वेळेत व्हावे. त्याला कोणतीही फाटे फुटू नये. म्हणून लोक पैसे देतात. हे पैसे म्हणजे अधिकृत कमाई असा समज उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकार व कर्मचाऱ्यांचा झाला आहे.
त्यामुळे या कार्यालयात अनधिकृत सुमारे पन्नास ते शंभर एजंट यांच्यामार्फत भ्रष्टाचाराची गटार गंगा वाहत असते. पावसाळ्यात तर त्या तुडुंब भरत असल्याने वाममार्गाने पैसे घेण्याचे प्रमाणे वाढलेले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची कल्पना नाही. असे म्हणणे हे धाडसाचेच आहे. कारण, ही परंपरा कायम आहे. यातून अनेकांचे उकळ पांढरे होत असते .
काल मात्र ज्येष्ठ नागरिकांनी स्वतंत्र दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त आज बारा हजार रुपयासाठी सातारा उप परिवहन कार्यालयातील त्या भ्रष्ट कर्मचाऱ्याचा चांगलाच सात-बारा मांडला .काम होत नसेल तर पैसे माघारी दया .लाज वाटली पाहिजे बारा हजार रुपये घेताना. वाट लावीन सांगतोय .पाच मिनिटात सर्टिफिकेट पाहिजे. बारा बारा हजार घेऊन दिवसभर ताटकळ ठेवता. तो कर्मचारी जागेवर नाही .गेलाय बोंबलत. पन्नास वेळा मागायला लागते. अशा पद्धतीने अक्षरशा ज्येष्ठ नागरिकांनी स्वाभिमानी बाणा दाखवला.
त्यामुळे खऱ्या अर्थाने या सर्व गोष्टीची चित्रीकरण करून त्यांनी सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कारभार चव्हाट्यावर आणलेला आहे. हाताच्या कंकणाला आरसा कशाला? अशा पद्धतीने हा सर्व प्रकार म्हणजे सातारा जिल्ह्यातील भ्रष्ट कारभाराची पोचपावती ठरलेली आहे. त्यामुळे आता नेमकी कारवाई होणार का ? हे प्रकरण दाबण्यासाठी पुन्हा प्रयत्न होणार ?याची आता चर्चा सुरू झालेली आहे. दरम्यान, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिले पाहिजे. तसेच झालेल्या प्रकरणाबाबत आपला सहभाग नाही हे दाखविण्यासाठी किमान प्रेस नोट किंवा पत्रकार परिषद आयोजित करून सातारा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी खुलासा करावा. त्यांचे स्वागत केले जाईल.अशी मागणी होऊ लागली आहे.
————————————————————–
फोटो – आर टो ओ कार्यालयात पैसे खावून ही कामात कुचराई केल्याबद्दल जाब विचारताना जेष्ठ नागरिक