सातारा:- वाई येथील न्यायालयात गोळीबारातील आरोपीस दोन दिवस पोलीस कोठडी.
संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
वाई:-न्यायालयात गोळीबारातील आरोपीला दोन दिवस पोलीस कोठडी.
वाई येथील न्यायालयात गोळीबार प्रकरणी राजेश चंद्रकांत नवघणे ( वय २६ , रा मेणवली) याला पोलिसांनी आज अटक केली.न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
नवघणे याच्याबरोबर आणखी काही लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांने गोळीबारात वापरलेले पिस्टल कोणाकडून घेतले याबाबत त्यांची कसून चौकशी सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.सोमवारी रात्री पोलीस महानिरीक्षक सुनील कुमार फुलारी यांनी वाई पोलीस ठाण्यास भेट देऊन तपासाबाबत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर उपविभागीय पोलीस अधिकारी बाळकृष्ण भालचिम, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अरुण देवकर पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, उपनिरीक्षक सुधीर वाळुंज कृष्णकांत पवार हे तपास कामी पोलीस ठाण्यात तळ ठोकून आहेत अधिक तपास परिविक्षाधीन सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना करत आहेत. लवकरच ठोस निष्कर्षा प्रत आम्ही पोहोचत असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पत्रकारांना सांगितले.