खटाव:-आपसातील बंधुत्व, एकी हीच आपली शक्ती:- पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे.
पत्रकार अनमोल गुरव खटाव:-9881355582

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार अनमोल गुरव खटाव
आपसातील बंधुत्व, एकी हीच आपली शक्ती:- पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे.
पुसेसावळीत अखंड हरिनाम सप्ताहासाठी मुस्लिम समाजाकडून भाविकांना महाप्रसाद
पुसेसावळी वार्ताहर :-‘प्रत्येक माणसाला जात, धर्म, पंथ असला तरी प्रत्येक व्यक्तीमध्ये जातीय सलोखा, राष्ट्रीय एकात्मता असतेच. ती जागृत करण्याचे काम आपण सर्वांनी केले पाहिजे’.आपसातील बंधुत्व,एकी हीच आपली शक्ती आहे असे मत औंध पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी व्यक्त केले
पुसेसावळी ता. खटाव येथे मंगळवार दिनांक 8 ऑगस्ट ते सोमवार दिनांक 14 ऑगस्ट या कालावधीमध्ये अखंड हरिनाम,जप, यज्ञ व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून यानिमित्ताने मंगळवारी मुस्लिम समाज जामा मस्जिद ट्रस्ट पुसेसावळी यांचे वतीने या अखंड हरिनाम सप्ताहासाठी येणाऱ्या सर्व भाविकांना महाप्रसादाचे आयोजन केले होते. यावेळी वर्धन ऍग्रो कारखान्याचे कार्यकारी संचालक विक्रमबाबा कदम, पुसेसावळीचे माजी सरपंच सुरेशबापू पाटील, माजी सरपंच दत्तात्रय रुद्रके, पुसेसावळी विकास सोसायटीचे माजी चेअरमन संतोष कदम आदी मान्यवरांनी सदिच्छा भेट दिली.
यावेळी बोलताना दराडे साहेब म्हणाले,पुसेसावळी नगरीत असलेली हिंदू मुस्लिम ऐक्याची परंपरा उल्लेखनीय असून शांतता आणि कायदा सुव्यवस्था बिघडण्याचा प्रयत्न कोणी करु नये. तसा प्रकार झाल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही मग तो कोणीही असो,अशा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी बोलताना वर्धन ऍग्रोचे कार्यकारी संचालक विक्रमबाबा कदम म्हणाले
पुसेसावळी गावाला प्रथम पासून हिंदू -मुस्लिम ऐक्याची, सामाजिक,अध्यात्मिक परंपरा आहे ही परंपरा अशीच पूढे सुरु राहील याबद्दल माझ्या मनात तर कसलीही शंका नाही मुस्लिम समाजाने आजचा जो उपक्रम राबवला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.
याप्रसंगी माजी ग्रा.पं.सदस्य अमोल कदम,बबलू पाटील,मुस्लिम समाजाचे युवा सामाजिक कार्यकर्ते सिराज बागवान, मा. सरपंच अकबरभाई बागवान, निवृत्त पीएसआय अब्दुल बागवान, माजी ग्रा.पं.सदस्य युसूफ बागवान, फैरोज बागवान,आसिफ बागवान (आचारी ), मनान पठाण, रफिक खान, दिलावर इनामदार,शाहिद आतार, आमन खान,आसिफ बागवान (RK), उमर बागवान, समीर बागवान (मिस्त्री ),शब्बीर इनामदार, अकील इनामदार, आशपाक बागवान, सलीम डांगे, रमजान मुल्ला, अल्ताफ बागवान, सोहेल बागवान, अरबाज मणेर, सुहेल आतार यांच्यासह गावातील ग्रामस्थ, हिंदू मुस्लिम बांधव, महिला, ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.