ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खंडाळा:-माहिती अधिकार कायदा जनजागृति अभियान केंद्र यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात अर्धनग्न मोर्चाचे निवेदन..

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

RPS STAR NEWS

माहिती अधिकार कायदा जनजागृति अभियान केंद्र यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात अर्धनग्न मोर्चाचे निवेदन..

 

खंडाळा सेतू घोटाळा प्रकरणातील दोषी घटक घटनांची कसून खाते निहाय चौकशी करून दोषी आहेत त्या सेतू ऑपरेटर यांना निलंबनासह दंडात्मक कारवाई करत नागरिकांचे झाले नुकसान भरपाई मिळावी असे महिती अधिकार कायदा जनजागृति अभियान केंद्राचे महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष श्री. सुनीलकुमार बावधनकर यांनी म्हणले आहे.
सविस्तर वृत्त असे की, २८/०५/२०२३ या दिनांकास त्यांच्या मुलाचे शैक्षणिक कामकाजाकामी उत्पन्नाचा दाखला माननीय तहसीलदार साहेब खंडाळा यांच्या कार्यालयातील सेतू विभागात ऑपरेटर मुकेश सपकाळ यांना मागितला परंतु तहसीलदार श्री. अजित पाटील आणि त्यांचे सहकाऱ्यांचे भ्रष्ट कामकाजाबद्दल मागील आठ महिन्यापासून त्यांनी पुराव्यासह लेखी तक्रार दाखल केल्यामुळे खंडाळा तहसीलदार, व सेतू घोटाळ्यातील मुख्य आरोपी मुकेश सपकाळ यांनी त्यांना १००० रुपयाची लाच मागितली व जाणीवपूर्वक हेतूने सदर उत्पन्नाच्या दाखल्याचे कामकाज व इतर कामकाज जाणीवपूर्वक दाखल केलेल्या तक्रारी अर्ज विनाकारवाई माघार घेत नाही म्हणून कर्तव्यात कसूर करत अधिकाराचा गैरवापर करून नागरिकांचे कामकाज जाणीवपूर्वक हेतूने पूर्ण करून देत नाहीत. तथा त्यामध्ये टाळाटाळ करून नागरिकांना वारंवार वरिष्ठांकर तक्रार करण्यास भाग पाडतात.
त्यामध्ये नागरिकांचे दररोजचे हजारो रुपये नुकसान होत असून हे सर्व नुकसान तहसीलदार खंडाळा व त्यांचे इतर कर्मचारी जे डी. एस. सी. वापरतात तसेच सेतू आणि इतर गंभीर भ्रष्ट प्रकरणांची त्यांनी स्वतः पोलखोल केली असून त्याची सदर प्रकरणांची चौकशी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये, माननीय मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे यांचे आदेशानुसार प्रलंबित असून तहसीलदार खंडाळा व त्यांचा सेतू विभाग हे जाणीवपूर्वक उत्पन्नाचे दाखले प्रलंबित ठेवतात व इतरांचे दाखले जे जास्त शुल्क देतात त्यांचे उत्पन्नाचे दाखले पूर्ण करीत असून रात्री अकरा वाजेपर्यंत भाडे तत्त्वावर डी.एस.सी. वापरणाऱ्या तोतया बोगस तहसीलदारांच्या माध्यमातून जे पैसे / लाच देतील त्यांचे उत्पन्नाचे दाखले दिले जातात व जे पैसे देत नाहीत व लाच देत नाहीत त्यांचे दाखले जाणीवपूर्वक अटकवून ठेवतात.
सदर प्रकरणामध्ये खंडाळा तहसीलदार व सेतू ऑपरेटर मुकेश सपकाळ, आदिनाथ देवकाते, सुलतान शेख यांचे विरुद्ध पुराव्यासह लेखी तक्रार दाखल करून तक्रारी झाल्या होत्या.
या सर्व खंडाळा सेतू घोटाळ्यामुळे खंडाळा तहसिलदार व नागरी सुविधा केंद्र सेतू खंडाळा यांच्या विरोधात दि. ११/०६/२०२४ रोजी जिल्हाधिकारी सातारा यांच्या दालनात अर्धनग्न मोर्चा काढण्यात येणार असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button