पुणे:-Yoga Next : Leadership, Entrepreneurship & Innovation – योग परिषदेचे यशस्वी आयोजन.
पत्रकार देवेंद्र साठे पुणे शहर अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

Yoga Next : Leadership, Entrepreneurship & Innovation – योग परिषदेचे यशस्वी आयोजन.

पुणे येथील प्रतिष्ठित MCCIA सभागृहात Yoga Next : Leadership, Entrepreneurship & Innovation या भव्य योग परिषदेचे अत्यंत शिस्तबद्ध व प्रेरणादायी वातावरणात आयोजन करण्यात आले. योग, नेतृत्व, उद्योजकता आणि नवकल्पना यांचा सुंदर संगम या परिषदेत अनुभवायला मिळाला.

कार्यक्रमाची सुरुवात नोंदणी व स्वागतपेयाने झाली. त्यानंतर प्रार्थना व दीपप्रज्वलनाद्वारे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे श्री सुबोध तिवारी (Secretary General – IYA व CEO, Kaivalyadhama Yoga Institute) तसेच विशेष सन्माननीय अतिथी प्रो. डॉ. भूषण पटवर्धन (Vice Chairman – UGC, Chairman – NAAC व WHO Advisory Group सदस्य) यांची मान्यवर उपस्थिती लाभली. त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी योगाचे शास्त्रीय, शैक्षणिक व सामाजिक महत्त्व अधोरेखित झाले.
कार्यक्रमात “Yoga for Kids” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले, जे बालवयोगटात योगसंस्कार रुजवण्यासाठी महत्त्वाचे पाऊल ठरले. IYA महाराष्ट्र चॅप्टरच्या अध्यक्षांचे स्वागतपर भाषण व सचिवांचे आभारप्रदर्शन यानंतर कार्यक्रम पुढे गेला.
Panel Discussion – 1 मध्ये Job Seeker ते Job Creator या विषयावर योग व्यावसायिकांसाठी नेतृत्व व उद्योजकतेच्या संधींवर सखोल चर्चा झाली. चहापानानंतर झालेल्या Panel Discussion – 2 मध्ये Innovation आणि Smart Yoga या विषयावर आधुनिक तंत्रज्ञान व पारंपरिक योग यांचा समन्वय कसा साधता येईल, यावर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचा समारोप भक्ती योग सत्र व शांती मंत्र यांच्याद्वारे शांत व सकारात्मक वातावरणात करण्यात आला. एकूणच ही परिषद योगाला करिअर, समाजसेवा व नवकल्पनांचे प्रभावी माध्यम म्हणून पाहण्याची नवी दृष्टी देणारी ठरली.




