आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाबळेश्वर:-स्मृतीशेष रामचंद्र सपकाळ यांच्या चौथ्या स्मृतिदिनी रमाई नगर देवळी येथे संपन्न.

पत्रकार उत्तम भालेराव महाबळेश्वर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

स्मृतीशेष रामचंद्र सपकाळ यांच्या चौथ्या स्मृतिदिनी रमाई नगर देवळी येथे संपन्न.

महाबळेश्वर | प्रतिनिधी
रमाई नगर, देवळी येथे स्मृतीशेष रामचंद्र तुकाराम सपकाळ यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रम भारतीय बौद्ध महासभा, तालुका महाबळेश्वर यांच्या अधिपत्याखाली अत्यंत भावनिक आणि ज्वलंत वातावरणात पार पडला.
समाजासाठी आयुष्य झोकून देणारे, बाबासाहेबांच्या विचारांशी निष्ठावान राहिलेले स्मृतीशेष रामचंद्र सपकाळ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करताना अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तर मनात संघर्षाची ज्वाला दिसून आली.
त्यांचे जीवन म्हणजे मौनातून बोलणारी लढाई, साधेपणातून उभा राहिलेला क्रांतिकारक विचार आणि पिढ्यान्‌पिढ्यांना दिशा देणारा सामाजिक वारसा होता.
या स्मृतिदिन कार्यक्रमास
भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष नितीन गायकवाड, सचिव अनिल सपकाळ, कोषाध्यक्ष एकनाथ भालेराव,
मुंबई शाखा अंतर्गत संस्कार उपाध्यक्ष संदीप मोरे, सचिव भरत कदम,
वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष उत्तम भालेराव,
भीम क्रांती युवक संघटना अध्यक्ष संतोष भालेराव,
मुंबई संघटनेचे अध्यक्ष यशवंत मोरे, सचिव जगन कदम, माजी सचिव शरद कदम,
समता सैनिक दलाचे राम कदम, बाबूराव सपकाळ, संपत मोरे, रवींद्र भालेराव, सकाराम कदम, रघुनाथ घाडगे यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी
“शरीर नश्वर असते, पण विचार अमर असतात”
या शब्दांत स्मृतीशेष रामचंद्र सपकाळ यांना अंतःकरणातून आदरांजली वाहिली.
हा स्मृतिदिन म्हणजे केवळ आठवण नव्हे—तो होता भीमविचाराच्या लढ्याला दिलेली शपथ, पुन्हा एकदा उभारलेली मुठ आणि परिवर्तनाचा निर्धार.
स्मृतीशेष रामचंद्र सपकाळ यांचे विचार, कार्य आणि संघर्ष
जोपर्यंत समाजात आहे, तोपर्यंत प्रेरणास्थान म्हणून जिवंत राहतील—हाच या स्मृतिदिना निमित्त हाच संदेश.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button