ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पनवेल:-क्रांतीज्योत महिला विकास फाउंडेशन समस्त बहुजन समाजाचा वतीने संभाजी भिडे यांचा पनवेल रायगड नवी मुंबईत जोरदार निषेध.

संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

क्रांतीज्योत महिला विकास फाउंडेशन समस्त बहुजन समाजाचा वतीने संभाजी भिडे यांचा पनवेल रायगड नवी मुंबईत जोरदार निषेध
पनवेल / प्रतिनिधी
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी अमरावती येथे महात्मा गांधींसह महात्मा जोतिबा फुले यांच्यावरही खळबळजनक टीका केली होती.याचे तीव्र पडसाद उमटले.श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान अकोला विभागाच्या वतीने संभाजी भिडे यांचे व्याख्यान रविवारी आयोजित करण्यात आले होते. संभाजी भिडेंनी क्रांतिसूर्य महात्मा फुले संदर्भात वादग्रस्त वक्तव्य करून गरळ ओकली होती. या विधानावरून महाराष्ट्रात ओबीसी बहुजन माळी समाजामध्ये संतापाची तीव्र लाट निर्माण झाली होती त्याच अनुषंगाने नवी मुंबई लगत रायगड पनवेलमध्ये देखील संभाजी भिडे यांचा आंदोलन करून निषेध करण्यात आला.
*यावेळी जेष्ठ मार्गदर्शक/ समाजसेवक आदरणीय सुरेश दिनकर जाधव सहाय्यक पोलीस आयुक्त [सेवानिवृत्त] याच्या मार्गदर्शना खाली क्रांतीज्योत महिला विकास फाउंडेशनच्या संस्थापिका /सामाजिक कार्यकर्त्या पत्रकार अध्यक्षा सौ.रुपालीताई शिंदे यांनी त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर पुरोगामी विचारधारेला माननाया बहुजन समाजाचा सहकाऱ्यांसह संभाजी भिडे यांनचा क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याचा पनवेल बस स्थानक येथे आंदोलन करून जाहीर निषेध केला, पनवेल मधून संभाजी भिडे ह्यांच्यावर गुन्हा दाखल होवा ह्या साठी तहसीदार‌ पनवेल.विज़य पाटील साहेब ह्यांच्याकडे निवेदन देण्यात आले.असेच गुन्हा नोंद होऊन पुढे अटक झाली नाही तर आम्ही हजारोंच्या संख्येने प्रशासन दरबारी विधानसभा वर जाऊ असे प्रशासन यंत्रणेला सबोदीत आयु विनिता बर्फे ह्यांनी केले.
शिव शाहू फुले आंबेडकर बहुजन अनुयायी आम्ही आई सावित्री व माई रमाच्या लेकी आम्ही संभाजी भिडे तुमचा भूतकाळ वाचायला लावू नका आम्ही संविधानाला मानतो म्हणून गप्प आहोत असे खडे बोल आयु नेहाताई ह्यांनी केले. ह्या साठी उपस्तित क्रांतिज्योत महिला विकास फाउंडेशन खजिनदार स्नेहा धुमाळ, सौ दुर्गा पाटील, आयु. नेहाताई शिंदे आजाद समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा, विनिता बर्फे सावता परिषद नवी मुंबई अध्यक्षा,उद्धवराव भुजबळ, सामाजिक कार्यकर्ते लहू मलख्मीर. महेशकुमार राऊत सावता माळी संदिप पवार माळी समाज विकास मंडळ कळंबोली नवी मुंबई अध्यक्ष. विकास जाधव नवनाथ घनवट रायगड जिल्ह्या माळी महासंघ अध्यक्षा सौ संगीताताई राऊत गौतमी जाधव, वैशाली हिवाळे, निकिता कोपरे, गुरूनाथ गायकवाड, सुभाष गायकवाड, विजय पवार, सागर गायकवाड, शुद्धोधन कांबळे, विकास तांडेल,भीम सैनिक -समसत ओबीसी बहुजन समाज अनुयायी व कार्यकर्ते पदाधिकारी हितचिंतक सावता /समता परिषद सामाजिक कार्यकर्ते सह सदस्य उपस्थित होते.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button