सातारा:-साताऱ्यात राष्ट्रवादी भवन मध्ये प्रवेशद्वारावर साहेब केबिनमध्ये अजित दादा,,,,
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
साताऱ्यात राष्ट्रवादी भवन मध्ये प्रवेशद्वारावर साहेब केबिनमध्ये अजित दादा,,,,
सातारा दि: काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या विदेशी मुद्द्यावरून काँग्रेस मधून फराकत घेऊन १९९९ साली राष्ट्रवादीची निर्मिती झाली. तेव्हापासून सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. पण, नुकतीच राष्ट्रवादीमध्ये फूट पडली असली तरी सातारा शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस भवन च्या प्रवेशद्वारा वर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार साहेब व कार्यालयातील केबिनमध्ये अजित दादा पवार यांची तसबीर आजही अनेकांना प्रेरणादायक ठरत आहे.
याबाबत माहिती अशी की, ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार साहेब यांनी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घोषणा केल्यानंतर सातारा जिल्ह्यातून सर्वप्रथम जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष लक्ष्मणराव पाटील यांनी राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यामध्ये एस काँग्रेस पासून कार्यरत असणारे अनेक नेते राष्ट्रवादीमय झाले होते. सातारा जिल्हा परिषद, अकरा पंचायत समिती, जिल्हा बँक, नगरपरिषदा व सहकारी संस्था या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात होत्या व आहेत.
सातारा शहरातील सदर बाजार परिसरात सातारा बस स्थानक पाठीमागे राष्ट्रवादी काँग्रेस भवनची इमारत उभे आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीच्या शुभ मुहूर्तावर दिनांक ९ मे २००३ रोजी या राष्ट्रवादी भवनची निर्मिती करण्यात आली. त्याचे उद्घाघाटन झाले होते. या वेळेला ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार साहेब, अजित दादा पवार रामराजे नाईक निंबाळकर, लक्ष्मणराव पाटील ,श्रीनिवास पाटील, शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, दीपक चव्हाण, बाळासाहेब पाटील, अभयसिंहराजे भोसले, आर. आर .पाटील, बबनराव पाचपुते, छगन भुजबळ, विक्रमसिंह पाटणकर ,डॉ शालिनीताई पाटील, सदाशिव पोळ, तुकाराम तुपे, भाऊसाहेब गुदगे, मदनराव पिसाळ, गायत्री देवी पंतप्रतिनिधी, बाळासाहेब भिलारे, सुधीर धुमाळ आदी मान्यवरांच्या उपस्थित होते.
आज या गोष्टीला वीस वर्ष पूर्ण झाली आहे .या वीस वर्षाच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची चढती कमान होती. पण सध्या २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चार ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागलेला आहे.
आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अजितदादा पवार यांच्या गट बाहेर पडला असून त्यांच्यासोबत सातारा जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर, आमदार मकरंद पाटील, आमदार दीपक चव्हाण यांनी अजित दादा सोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. तरीही राष्ट्रवादी भवन म्हणजे आजही साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशी धारणा झालेली आहे. अशा वेळेला सातारा जिल्ह्यात अजितदादा पवार यांनाही मानणारा मोठा गट आहे. त्यामुळे सोडलं तर पठतय धरलं तर चावतय अशी राजकीय परिस्थिती दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांची झालेली आहे. त्यामुळे काहींनी दोन्ही डगरी वर हात ठेवून आपली राजकीय वाटचाल पुढे सुरू ठेवण्याचा मनस्वी प्रयत्न सुरू केलेला आहे. त्यामुळेच सातारा शहरातील राष्ट्रवादी भवन मध्ये प्रवेशद्वारा वर साहेबांचा व कार्यालयातील केबिन मध्ये अजित दादांची तसबीर आजही दिमाखात उभे आहे . सध्या एका म्यानात दोन तलवारी आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आपापल्या परीने स्वतःकडे ढाल केलेली आहे. तितकेच खरे मानले जात आहे .सध्या अजित दादाच्या बंडा नंतर राष्ट्रवादी भवन मध्ये तुरळक गर्दी दिसून येत आहे पूर्वी गजबजलेल्या राष्ट्रवादी भवन मध्ये अनेक कार्यकर्त्यांची ये जा होत असते. आता मात्र तुरळक प्रमाणात कार्यकर्ते येत असले तरी पुन्हा एकदा राष्ट्रवादी भवन गजबज होऊन जाईल .अशी आशा राष्ट्रवादी पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना वाटू लागलेली आहे. त्यामुळे हम सब एक है असेच म्हणवून घेणे आवश्यक ठरते आहे.
—————————————————————–
छाया- राष्ट्रवादी भवन मधील प्रवेशद्वारावर साहेबांची छबी व केबिन मधील अजित दादांची तस्वीर अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे (छाया- अजित जगताप, सातारा)