पुणे:-पुण्यात पंतप्रधान मोदिंचा निषेध करण्यासाठी आ.धंगेकर यांचे आंदोलनाने वेधून घेतले लक्ष.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
पुण्यात पंतप्रधान मोदिंचा निषेध करण्यासाठी आ. धंगेकर यांचे आंदोलनाने वेधून घेतले लक्ष.
पुणे दि: विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टिळक पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमापूर्वीच आमदार रवींद्र धंगेकर यांनी आंदोलन केले. या आंदोलनामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
पुणे शहरांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टिळक पुरस्कार प्रदान करण्याच्या कार्यक्रमापूर्वी पुणे शहरातील नागरिकांना वेठीस धरण्यात आले. अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडणाऱ्या लोकांनाही रस्ता रोखण्यात आल्यामुळे खूप मोठी अडचण झाली होती .ज्या पुण्यामध्ये अनेक क्रांती करण्यात आली मात्र आज पुणे शहरात स्मशान शांतता दिसून आली. गेले तीन महिने मणिपूर राज्य जातीय वादामुळे जळत असताना त्या ठिकाणी न जाता पुण्यातील पुरस्कारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आले होते. त्यांच्या शोच्या कार्यक्रमाला प्रचंड मोठ्या प्रमाणात जनतेतूनच उठाव झाला आहे. त्याचे प्रतीक म्हणून राष्ट्रीय काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी गळ्यात फलक लावून निषेध नोंदवला. आज रस्त्यावरून गळ्यात फलक लावून रस्त्याने जात असताना त्यांना अडविण्यात आले होते.
आमदार धंगेकर यांना पोलिसांनी अडवलं त्यांच्या हाताला धरून त्यांना अटक करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. तसेच गळ्यातील फलक काढण्याचाही प्रयत्न पोलिसांनी केला होता. लोकशाही पद्धतीने महात्मा गांधीच्या विचाराप्रमाणे हे आंदोलन चालले असताना पोलिसांनी बळजबरी केलेली आहे .खरं म्हणजे पोलीस यंत्रणेवरचा विश्वास उडाला असून या लोकशाहीचा हत्या करणाऱ्यांचा निषेध व्यक्त केला जात आहे. सध्या पुण्यामध्ये या टिळक पुरस्काराच्या कार्यक्रमाला अघोषित बहिष्कार घातल्याचे चिन्ह दिसत होते. प्रसारमाध्यमांनी ही आमदार धंगेकर यांच्या भूमिकेचे प्रसारण केले.त्यामुळे टिळक पुरस्कार हा चांगलाच गाजत आहे.
———-++———————————————–
फोटो—-आ रवींद्र धगेकर यांना अटक करताना पोलीस दल