महाबळेश्वर:-माजी मुख्यमंत्री व शिवसेना कुंटुब प्रमुख उध्वजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त महाबळेश्वर येथे रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न.
पत्रकार रियाज मुजावर महाबळेश्वर:-9403546485

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार रियाज मुजावर महाबळेश्वर
माजी मुख्यमंत्री व शिवसेना कुंटुब प्रमुख उध्वजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त महाबळेश्वर येथे रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न.
शिवसेना पक्ष प्रमुख मा.उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्ताने रविवार दि.३० जुलै रोजी महाबळेश्वर अर्बन बॅंक सभागृहात रक्तदान शिबीर महिला आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आले होते.प्रारंभी शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख श्री. सचिन मोहीते यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात येऊन छञपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले तर माजी जिल्हाप्रमुख नंदकुमार घाडगे आणि वाई विधानसभा संपर्कप्रमुख श्री.रामदास कांबळे यांच्या हस्ते फीत कापुन शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. मान्यवरांचे सत्कार सोहळा नंतर जिल्हाप्रमुख सचिन मोहीते म्हणाले सध्याच्या शिवसेनेच्या संघर्षमय काळात येथील शिवसैनिक नि:स्वार्थी पणे उध्दवजी ठाकरे यांच्या मागे ठाम आणि भक्कम उभा राहिला आहे याचा अभिमानll वाटतो.यावेळी व्यासपीठावर नंदकुमार घाडगे, रामदास कांबळे, यशवंत घाडगे,राजेश कुंभारदरे, संतोषआप्पा जाधव, लिलाताई शिंदे,महिला संघटिका राजश्री भिसे,सचिन वागदरे आदी उपस्थित होते*. *कार्यक्रमाचे सुञसंचलन राजेंद्र पंडीत यांनीं केले तर आभार प्रदर्शन राजश्री भिसे यांनी केले. यावेळी माजी नगरसेवक प्रवीण शिंदे, नाट्यशिवप्रतिष्ठानचे किसन खामकर, टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष अशोक ढेबे, अर्बन बॅंकेचे माजी अध्यक्ष अशोक फळणे, मनोज ताथवडेकर,गिरीषशेठ नायडु, जयवंत वाईकर, प्रमोद लोखंडे,माचुतर सरपंच सुरेश पाटील,शिवआरोग्यसेना तालुका संघटक शंकर ढेबे,अमोल साळुंखे, महिला तालुका संघटक सुजाताताई मोरे,लक्ष्मीताई मालुसरे,शहर संघटीका सुनिता फळणे, क्षेञ महाबळेश्वर विभाग संघटीका इंदुताई धनावडे,प्राजक्ता धनावडे,सुरेखाताई लांगी, विद्या शिंदे, युवा सेनेचे आकाश साळुंखे, प्रवीण कदम, राजेंद्र साळवी, पञकार सचिन शिर्के, अभिजीत कानडे, अरूण बावळेकर, सुनील काका शिर्के,शाहनवाज खारकंडे, निलेश धनावडे, ऋषी खोत,शुभम कुंभारदरे,विक्रम मोरे, पत्रकार राजेश सोंडकर, स्वरूप देवकर,अंकित यादव, आकाश कदम आदी मान्यवर आणि रक्तदाते उपस्थित होते.सदर कार्यक्रम यशस्वी करणे साठी शहरप्रमुख महेश गुजर, उपशहरप्रमुख उस्मानभाई खारकंडे,आणि शिवसैनिक पदाधिकारी यांनी विशेष प्रयत्न केले.