पुणे:-खडकवासला धरणातील पाण्याचा विसर्ग सुरू – धरण पूर्ण क्षमतेने भरले.
पत्रकार प्रमोद काळे हवेली तालुका उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
खडकवासला धरणातील पाण्याचा विसर्ग सुरू – धरण पूर्ण क्षमतेने भरले.
पुणे: खडकवासला धरण परिसरात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या जोरदार पावसामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे प्रशासनाने आजपासून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.
धरणातील जलस्तर 77% क्षमतेपर्यंत पोहोचल्यामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीत पाणी सोडण्यात येत आहे. आज सकाळपासूनच सुमारे 25696 क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने मुठा नदीच्या काठी राहणाऱ्या नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, नदीकाठी जाऊ नये, असे आवाहन पुणे महापालिका व जलसंपदा विभागातर्फे करण्यात आले आहे.
खडकवासला जलसाठ्यातून पाणी सोडण्याचा निर्णय हवामान विभागाच्या अंदाजानुसार घेतला गेला आहे. परिसरात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्याने धरण प्रशासनाने ही खबरदारी घेतली आहे.
महत्वाचे:-1)नदीपात्रात उतरणे टाळा.
2) लहान मुलांना नदीकाठी जाण्यापासून प्रतिबंधित ठेवा.
3) प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा.
RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.
ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन