सातारा:-अखिल भारतीय भोई समाजसेवा संघा चा गुणवंत विद्यार्थी व समाजातील पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ संपन्न.
पत्रकार निलेश मोरे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष:-8390501946

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार निलेश मोरे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष
अखिल भारतीय भोई समाजसेवा संघा चा गुणवंत विद्यार्थी व समाजातील पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ संपन्न.
सातारा –
समाजामार्फत झालेला गौरव हा सामाजीक कार्याचा मानबिंदू असल्याचे प्रतिपादन वाई अर्बन बँकेचे संचालक चंद्रकांत गुजर यांची केले
अखिल भारतीय भोई समाजसेवा संघाच्या सातारा जिल्हा शाखेने जिल्हयातील विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थी व समाजातील पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ रविवारी पाठक हाॅल सातारा येथे संपन्न झाला
या़वेळी दहावी बारावी परीक्षेत विषेश प्राविण्य मिळवलेल्या 45 विद्यार्थी व इयत्ता पाचवी आठवीतील स्कॉलरशिप मंथन परिक्षेत यश संपादन केलेल्या 9 विद्यार्थ्यांचा कै दत्तात्रय श्रीरंग वंजारी व कै रुक्मिणी श्रीरंग वंजारी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आला
चंद्रकांत वंजारी यांची शिवकृपा सहकारी पतपेढी च्या उपाध्यक्ष पदी व शुभांगी वंजारी यांची संचालक पदी तसेच श्री चंद्रकांत गुजर यांची वाई अर्बन बँकेच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल समाज भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले यावेळी विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती करण्यात आली यामध्ये युवराज शिंदे यांची राज्य कार्याध्यक्ष पदी रविंद्र कांबळे राज्य उपाध्यक्ष पदी घनश्याम चक्के यांची वाई शहराध्यक्ष पदी चंद्रकांत जिरंगे यांची कराड शहराध्यक्ष पदी निवड करण्यात आली प्रसंगी समाजातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.