ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाबळेश्वर:- तापोळ्याला जाणाऱ्या रस्त्यावर चिखली गावाजवळ दरड कोसळून वाहतूक ठप्प – दरड हटवण्याचे काम सुरू.

पत्रकार रियाज मुजावर महाबळेश्वर तालुका अध्यक्ष:-9403546485

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार रियाज मुजावर महाबळेश्वर तालुका अध्यक्ष

महाबळेश्वर (सातारा)
गेल्या दोन दिवसांपासून जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ व पावसाचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या महाबळेश्वर येथे मुसळधार पाऊस होत आहे. महाबळेश्वर लगतच्या परिसरात जवळपास २७५मी.मी पावसाची नोंद झाली आहे. पाऊस रात्रभर पडत असल्यामुळे नदी, ओढे, नाले यांना मोठ्या प्रमाणात पूर आला आहे त्यामुळे पाणी वेण्णा लेक परिसरातील अनेक शेता मध्ये व गहू गेरवा शेजारील परिसराच्या शेजारील घरांमध्ये पुराचे पाणी शिरले असून
महाबळेश्वर व पाचगणी रोडवर अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचल्याने वाहतूकीचा खोळंबा झाला आहे.
महाबळेश्वर पोलादपूर रोडवर आंबेनळी घाटामध्ये रात्री दरड पडल्यामुळे महाड नाक्याजवळ प्रशासकीय यंत्रणेने वाहतूक थांबवली होती. सकाळपासून शासकीय यंत्रणे दरड हटवण्याचे काम सुरू केले आहे.
तापोळा रोडवर चिखली गावाजवळ दरड कोसळली असून ती हटवण्याचे काम सुरू आहे.
गेल्या दोन दिवसांपासून महाबळेश्वर भागात मुसळधार पाऊस कोसळतो आहे. हवामान खात्याने सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट दिला आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button