सातारा:-जीत की मजबूत दिवार , धाडसी नेते अजितदादा पवार —- अजित जगताप, सातारा.
संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
जीत की मजबूत दिवार , धाडसी नेते अजितदादा पवार- अजित जगताप सातारा
राजकारणामध्ये काही निर्णय हे पटकन घेतले तर त्याचा फारच परिणाम राजकीय दृष्ट्या .होत नाहीत . धाडसी निर्णय घेणे हे यशस्वी राजकीय नेत्याची ओळख असते. त्यामुळे आज संपूर्ण महाराष्ट्रात राज्याचे आठवे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घेतलेल्या निर्णयाची आजही मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत आहे. याचे कारण म्हणजे जित की मजबूत दिवार म्हणजेच धाडसी नेते अजितदादा पवार हे समीकरण झालेले आहे. दि२२ जुलै हा त्यांचा वाढदिवस आहे . विविध सामाजिक कार्यकर्ते त्यांना भेटण्यासाठी व शुभेच्छा देण्यासाठी देवगिरी बंगल्यावर येणार आहेत . महाराष्ट्राच्या प्रगल्भ , नीतिमत्ता व विश्वसनीय राजकारणाला गालबोट लावण्याचे काम यापूर्वीच झालेले आहे. पण सध्या गालबोट नव्हे तर मुक्का मार दिल्याची राजकीय टीका होऊ लागलेली आहे. एकेकाळी विचाराने दोन टोकाला असलेल्या राज्यकर्त्याची आघाडी- युती पाहणे म्हणजे मुंगूस आणि साप यांनी एकमेकांशी मैत्री करणे. असाच भास महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेले आहे. या राजकीय घडामोडी मध्ये केंद्रबिंदू ठरलेले अजितदादा पवार यांच्या यशस्वी अपराजित व अजिंक्य राजकीय जीवनामध्ये प्रथमच एक संघर्ष योद्धा व्हावे लागलेले आहे. तरी ही आदरणीय जेष्ठ नेते शरदचंद्र पवार साहेब यांच्याशी असलेली निष्ठा तुसभर सुद्धा कमी झालेली नाही. राजकीय घडामोडी नंतर ही त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून जेष्ठ नेते शरदचंद्र पवार साहेब यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांच्या सोबत महत्वाचे नेते सुद्धा होते. जलसंपदा विभागाच्या एकाहत्तर हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचाराचा ज्यांनी आरोप केला होता. ते आता अजितदादा पवार यांच्या सोबत सरकार मध्ये काम करीत आहेत. यातच सर्व काही आले आहे.
राज्याचे आठवे उपमुख्यमंत्री झालेले अजितदादा पवार हे बी कॉम आहेत. तसेच अर्थ खाते सांभाळताना अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगलेच झुकते माप दिल्यामुळे आजच्या घडीला ३७ आमदार त्यांच्या सोबत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुळातच त्यांचे वडील हे चित्रपट सृष्टीची निगडित असल्याने अनंतराव पवार यांनी चित्रपट निर्माते व्ही शांताराम यांच्या समवेत काम केले. त्याच पद्धतीने अजितदादा पवार यांनीही अनेक नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार व संसदीय राजकारणात काम करीत आहेत. अभ्यासू वृत्ती तसेच चिकित्सा स्वभाव हा त्यांचा गुणधर्म नुकताच पहाण्यास मिळाला आहे. सातारा वेध अंकाची पाहणी करून त्यांनी आपला जीवनपट व प्रसिद्ध झालेला लेख, जाहिरात पाहून काही उपयुक्त सूचना केल्या. मी, शैलेश धुमाळ, रेवणसिद्ध महाजन, संजय कदम या सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागातून आलेल्या पत्रकारांना नाष्टा व चहा दिला तसेच पावसाळी अधिवेशनाच्या काळात सुमारे अर्धा तास वेळ देवून त्यांनी आमची मने जिंकली. त्यांना भेटण्यासाठी राज्याच्या कानकोपऱ्यांतून लोक येत असतात. त्याच बरोबर त्यांची जबाबदारी वाढली आहे. भविष्यात देशाच्या राजधानी मध्ये त्यांचा प्रवेश झाल्यास नवल वाटणार नाही. त्याठिकाणी ही मोठी जबाबदारी ते पार पडतील. याबद्दल दुमत नाही.
खरं म्हणजे अजितदादा पवार या नावाला वलय निर्माण करण्याचे मोठी कामगिरी ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांनी केली आहे. हे कधीही विसरून चालणार नाही. विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त, राज्य बँकेचे अध्यक्ष, लोकसभेचे खासदार, सहा वेळा बारामतीचे आमदार, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री व उपमुख्यमंत्री आणि अनेकदा हूकलेले मुख्यमंत्रीपदी त्यांना विराजमान झाल्याचे पाहण्याचे स्वप्न अनेक कार्यकर्ते बाळगून आहेत.
तसं पाहता अजितदादा पवार यांनी स्पष्ट वक्तेपणा त्याचबरोबर पक्ष पातळीवर केलेली बांधणी तसेच पुरंदर येथील शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे बापू यांना ””””””बेटा तू कसा निवडून येतो? हेच पाहतो. अशी खुलेआम धमकी देऊन पुरंदरे मतदार संघात त्यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे संजय जगताप यांना निवडून आणले होते. त्यामुळे अजित दादा पवार यांचा दबदबा आजही कायम राहिलेले आहे. पिंपरी चिंचवड शहराच्या निर्मितीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा असल्यामुळे त्यांनी अनेक राजकीय निर्णय घेतले. सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांनी दमदार कामगिरी केली. त्याचबरोबर काँग्रेस पक्षातून अनेक नेते व कार्यकर्ते त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आणण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला होता. आपल्या कोणीही पाया पडू नये यासाठी ते दक्षता घेतात. तसेच कामाबाबत स्पष्ट सांगून एक घाव दोन तुकडे करतात. त्यांच्या या भूमिकेने त्यांचा राज्यातील मंत्री मंडळात मोठा दबदबा निर्माण केला आहे.
हे जरी खरे असले तरी सर्वसामान्य कार्यकर्त्यापेक्षा राजघराण्याला सातारा जिल्ह्यात झुकते माप देणारा नेता अशी अजितदादा पवार यांची नवीन ओळख झाली होती. ही कदाचित पुसून निघणार नाही. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यामध्ये सर्वच राजकीय पक्ष नेते ,कार्यकर्ते, अधिकारी तसेच हितचिंतक जमलेले आहेत. या सर्वांचे सुप्त इच्छाही आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी अजितदादा पवार असावेत .अशी त्यांचीही इच्छा दिसत आहे. सध्या अजितदादा पवार यांचे पाऊल दमदार पडले असून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्येही त्यांची अफाट लोकप्रियता कारणीभूत ठरलेली आहे. त्यामुळे भविष्यात अजितदादा पवार यांना एक चांगली संधी चालून आली असून देशपातळीवर हा मूळचा सातारा जिल्ह्यातील अजिंक्य कार्याचा तारा चमकून निघेल. अशी आशा व्यक्त होत आहे. श्रीमान अजित दादा पवार यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा……..
—- अजित जगताप मु. पो. सायगाव ता. जावली जिल्हा सातारा
मोबाईल नंबर 99 22 24 12 99
——————————————————————-