सातारा:-भाजपचे नवे 70 जिल्हाध्यक्ष- सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांची नियुक्ती.
पत्रकार नितीन कुलकर्णी:-9307293406

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार नितीन कुलकर्णी
भाजपचे नवे 70 जिल्हाध्यक्ष-
सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांची नियुक्ती.
भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक रचनेतील महत्वपूर्ण दुवा असलेल्या जिल्हा अध्यक्षांची नवी टीम जाहीर करण्यात आली.70 जिल्हा अध्यक्ष यांची नवी टीम राज्यात जाहीर करण्यात आली असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.यामध्ये सातारा जिल्हाध्यक्ष पदी धैर्यशील कदम यांची नियुक्ती केली आहे.
वर्धन ॲग्रो साखर कारखान्याचे चेअरमन, कराड उत्तर भाजपचे नेते धैर्यशीलदादा कदम यांच्या निवडी मुळे कराड उत्तर भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे, गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत एकदा कॉंग्रेस मधुन,एकदा शिवसेनेतून निर्णायक मते मिळवली होती, काही दिवसांपूर्वी भाजपात प्रवेश केला होता. खासदार रणजितसिंह निंबाळकर आमदार जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली धैर्यशील कदम यांनी विकास कामांचा झंझावात सुरू आहे,पक्ष वाढीसाठी मोठे योगदान दिले आहे,अशा नेतृत्वाला ताकद मिळावी यासाठी आमदार जयकुमार गोरे यांनी चांगलीच कंबर कसली आहे, आमदार गोरे यांनी धैर्यशील कदम यांच्या पाठीमागे मोठी ताकद उभी केली आहे, त्यातच भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष पद धैर्यशील कदम यांना मिळाल्याने कराड उत्तर मध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे, सर्व स्तरातून धैर्यशीलदादांचे अभिनंदन करण्यात येत आहे. धैर्यशील कदम यांची निवड झाल्याबद्दल,उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, खासदार उदयनराजे भोसले,आमदार जयकुमार गोरे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले,विक्रम पावसकर, मनोज दादा घोरपडे यांनी अभिनंदन केले.