वाई:-चिखली तंटामुक्ती समिती अध्यक्ष रोहित वाडकर यांचा आदर्शवत निवाडा !
अशितोष चव्हाण:-सह-संपादक-7378619519
ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
अशितोष चव्हाण:-सह-संपादक-7378619519
चिखली तंटामुक्ती समिती अध्यक्ष रोहित वाडकर यांचा आदर्शवत निवाडा !
चिखली येथील मोर्जीवाडा तसेच वाडकरवाडी येथील तरुणांमध्ये झालेल्या भांडणात भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्या तंटामुक्ती समिती अध्यक्षांबरोबरच वाद झाल्याने वाई पोलीस स्थानकात परस्परविरोधी गुन्हे दाखल झालेने चिखली गावात तणावाचे वातावरण होते. त्यात स्वतः अध्यक्षांनी पुढाकार घेऊन सार्वजनिक जीवनात काम करत असलेने स्वतः एक पाऊल मागे घेऊन हा वाद मिटवण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरु करण्यात येईल असं ठरले.
संबंधीत तरुणांनी गावाला वेठीस धरल्याबद्दल संपूर्ण गावाची माफी मागावी आणी गावात नव्याने नूतनीकरण झालेल्या स्मशानभूमीत वृक्षारोपण करावे अशी शिक्षा तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष रोहित मारुती वाडकर यांनी सांगितली. उपस्थित सर्व ग्रामस्थांनी याला होकार देत अध्यक्षांच्या भूमिकेचे स्वागत केले.
तसेच स्वतःच्या एका वर्षाच्या कारकिर्दीत 100% तंटे सोडवण्यास यश आलेले असताना हा वाद इतका टोकाला गेला ते दुर्दैवी असल्याचे त्यांनी सांगितले. तरुणांवर गुन्हे दाखल झालेले असताना राजकीय स्वार्थासाठी वाद विकोपाला कसा जाईल याची तजविज काही लोक पहिल्या दिवसापासून करत असून त्यात त्यांना यश मिळू द्यायचे नाही अशी चिखली ग्रामस्थ्यांची भूमिका असल्याचे अध्यक्षांनी सांगितले.
चिखली गावात झालेली बैठक तालुक्याला आदर्शवत असून राजकीय हेवेदेवे बाजूला सारून घेतलेल्या निर्णयाची सगळीकडे चर्चा आहे. संबंधीत निवाड्यासाठी चिखली चे माजी सरपंच श्री. ब्रहदेव वाडकर, श्री. नारायण वाडकर, शंकर वाडकर चेअरमन,शंकर शिंदे चंद्रकांत वाडकर, संजय वाडकर, संतोष पाटील, नामदेव मांढरे राजेंद्र धनावडे, राजेश सोंडकर यांनी पुढाकार घेतला तसेच गुन्हे मागे घेत असताना कायदेशीर बाबींची जबाबदारी ऍड. विशाल वाडकर यांना देण्यात आलेली आहे.